श्रीराम लला मुर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त म्हसवड मध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )

म्हसवड

              आज सोमवारी अयोध्या येथील मंदिरात श्रीराम लला मुर्ती प्रतिष्ठापने निमित्त येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ, श्रीराम मंदिरात तसेच शहरातील प्रत्येक भागातील विविध मंदिरात या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तसेच राम भक्तांनी आज सकाळी रामरथाची भव्य मिरवणूक काढून श्रीरामांच्या जय घोषाने म्हसवड नगरी दुमदुमली होती तर शहर व परिसरात भगववे झेंडे व भगव्या पताका लावल्याने संपूर्ण शहर भगवामय झाले होते व सर्वत्र फटाके वाजवण्यात येत असल्याने आज दिवाळी असल्याचा आभास निर्माण झाला होता.  

 

           म्हसवड शहरात ही या निमीत्ताने सर्वत्र मोठा उत्साह दिसुन आला. सकाळी 6 वाजलेपासुनच या आनंदी सोहळ्यास सर्वत्र शुभारंभ करण्यात आला, येथील श्रीराम मंदिरात भल्या पहाटे प्रभु श्रीरामाची काकड आरती संपन्न झाली, मंदिरातच सकाळच्या प्रहरी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर मंदिर व परिसरात सामुहिक रामनामाचा जप सुरू होता, तर सकाळी 8 वाजता श्रीराम मंदिरापासुन रामनामाचा जय घोष व जप करीत भव्य अशा या फेरी मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक रामभक्ताने डोक्यावर श्रीरामाच्या नावाची भगवी टोपी तर खांद्यावर भगवा गमजा, हाती भगवे वस्त्र, महिलांनीही भगवे फेटे, भगव्या साड्या परिधान केल्या होत्या, तर शहरातील प्रत्येक गल्ली बोळासह, मुख्य रस्ते, चौक याठिकाणी भगवे ध्वज लावण्यात आल्याने संपूर्ण म्हसवड नगरी ही भगवी व रामनगरी बनल्याचे दृष्य पहावयास मिळाले. या फेरीमध्ये माण-खटावचे आ. जयकुमार गोरे यांनी आपल्या पत्नीसह सहभागी होत रामनामाचा जयघोष केला. संपूर्ण शहराला नगरप्रदक्षणा घालुन सदर फेरी पुन्हा येथील राममंदिरासमोर उभारण्यात आलेल्या भव्य शामीयान्यात आली असता याठिकाणी रामरक्षा म्हटली यावेळी उपस्थित रामभक्तांनी एका सुरात रामरक्षा पठण करण्यात आली . तद्नंतर महाआरती संपन्न झाली तर दुपारी 12 वा. 29 मिनिटांनी श्रीरामाच्या मुर्तीस सर्वांनी मोठ्या श्रध्देने अक्षदा वाहत रामलल्लाचा जय घोष केला. यानंतर मंदिरात प्रसाद वाटण्यात आला.

     तर येथील प्रसिद्ध व्यापारी महेंद्रकुमार मोडसे यांनी आपल्या शांती सुपर मार्केट शेजारी मोठा मंडप घालून प्रभु श्रीरामलल्लाच्या प्रतिमेवर अक्षदा वाहण्याचा कार्यक्रमाचे  आयोजन केले होते महा प्रसादासाठी त्यांनी कुंडल हून आणलेल्या  १०० किलो  बुंदी लाडूचे  वाटप केले

येथील राममंदिराप्रमाणेच शहरातील विविध ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम यानिमीत्त ठेवण्यात आले होते, येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ मंदिर, व शहरातील इतर देवी देवतांच्या मंदीरात तसेच भगवानगल्ली येथे देशमाने यांच्या निवासस्थानी,   तर मेगासिटी येथे श्रीमती रेखा कुलकर्णी यांच्या निवासस्थानी  प्रभु श्रीरामलल्लाच्या प्रतिमेवर अक्षदा वाहण्याचा कार्यक्रम तसेच भजन किर्तन  अशा विविध कार्यक्रमांनी संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरणात दिवसभर निर्माण झाले होते. 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!