विविध संघटना यांनी घरकुल योजना अंमलबजावणी साठी कराड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा,पोलीस प्रशासन व कार्यकर्ते यांच्यामध्ये शाब्दिक चकमक.

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते कराड

       कराड तालुक्यातील पंतप्रधान घरकुल योजना याचे अनुदान रखडल्यामुळे व संभाव्य घरकुल रखडली होती,हप्त्याची रक्कम वाढवावी तीन लाखापर्यंत अनुदान द्यावे घरकुल योजना जलद गतीने पूर्ण व्हावी अशा विविध मागण्यासाठी आंदोलन व मोर्चा आयोजन करण्यात आले होते

      . मोर्चा तहसीलदार कार्यालयावर गेला असता गेटवर पोलीस प्रशासनाने आंदोलन करताना थांबवले त्यामुळे आंदोलन करते व पोलीस प्रशासन यांच्यात शाब्दिक चकमक झाली. घरकुल आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत आंदोलन कर्त्यांनी परिसर दुमदुमून सोडला गटविकास अधिकारी व नायब तहसीलदार बाबुराव राठोड व सहाय्यक गटविकास अधिकारी विजय विभूते यांनी निवेदन स्वीकारले,राज्य शासनाला पाठवण्याचे आश्वासन यावेळी आंदोलन कर्त्यांना देण्यात आले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!