महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या दीक्षाभूमी ते मंत्रालय या पत्रकार संवाद यात्रेस सुरुवातीपासूनच राज्यातील विविध संस्था, संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पाठबळ मिळत असून विविध संस्था व संघटनांनी आपल्या पाठिंब्याचे पत्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे यांच्याकडे सुपूर्द केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची दीक्षाभूमी ते मंत्रालय ही पत्रकार संवाद यात्रा २८ जुलै पासून नागपूर येथून सुरू झाली. पहिल्या टप्प्यात विदर्भ, खानदेश, उत्तर महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांचा दौरा केला. त्याकाळात १०० हून अधिक संस्था व संघटनांनी या पत्रकार संवाद यात्रेस जाहीर पाठिंबा दिला.
१३ ऑगस्ट पासून पत्रकार संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास छत्रपती संभाजीनगर येथून प्रारंभ झाला. बीड, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर, सांगोला, पंढरपूर, सांगली, कोल्हापूर, बत्तीस शिराळा, कराड, उंब्रजकडे रवाना झाली. या प्रवासादरम्यान महाराष्ट्र वीज कामगार महासंघ सातारा, लिंगायत समाज संघटना उंब्रज, मी वडार महाराष्ट्राचा, कराड तालुका ग्रंथालय संघ, शिव योद्धा प्रतिष्ठान उंब्रज, लिंगायत समाज उंब्रज ,सातारा श्री जानाई देवी देवस्थान ट्रस्ट उंब्रज, श्रीराम देवस्थान चाफळ अशा अनेक संस्था व संघटनांनी पाठिंबा दिला.