पाणीदार आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नातून म्हसवड मध्ये विविध विकास कामाचा भूमिपूजन समारंभ : विजयकुमार धट ;
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
पाणीदार आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नातून
म्हसवड शहराचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणारी एकूण 80 कोटी ची म्हसवड नळ पाणीपुरवठा योजना व शहरातील अंतर्गत रस्ते गटरतसेच अहिल्याबाई होळकर शॉपिंग कॉम्प्लेक्स महात्मा ज्योतिबा फुले चौक सोशोभीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा समारंभ रविवार
दिनांक 3 /9/ 2023 रोजी संध्याकाळी ठीक पाच वाजता:- माननीय नामदार महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील साहेब व नामदार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचे माजी नगराध्यक्ष विजयकुमार धट यांनी सांगितले
तसेच आमदार जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून शहरातील विविध विकास कामांचे म्हसवड नगरपरिषद हद्दीत उद्यम नगर क्रमांक एक अंतर्गत रस्ते व गटार बांधकाम करणे तसेच सातारा पंढरपूर रोड अप्रोच ते मरीआई मंदिर रस्ता डांबरीकरण करणे बनगरवाडी बेघर वसाहत अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे मल्हार नगर अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे सातारा पंढरपूर अप्रोच ते मेरी माता हायस्कूल रस्ता डांबरीकरण करणे म्हसवड नगर परिषद हद्दीतील वीरकरवाडी देवापुर अप्रोच राखुंडे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे अहिल्याबाई होळकर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे करणे दहिवडे मळा ते नागोबा मंदिर रस्ता डांबरीकरण करणे राऊतवाडी रस्ता डांबरी करण करणे लांब मळा रस्ता डांबरीकरण करणे दहिवडी मळा ते नागोबा रस्ता भाग क्रमांक दोन डांबरीकरण करणे बनगरवाडी रस्ता डांबरीकरण सातारा पंढरपूर अप्रोच विरकर मळवी रस्ता डांबरीकरण करणे पंतवस्ती अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे अशी सात कोटी 75 लाख 58 हजार 681 रुपयांच्या कामाची भूमिपूजन व इतर 13 कोटी रुपयांचे भूमिपूजन होणार आहेत तरी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दिनांक रविवार 3 /9 /2023 रोजी बाजार पटांगण म्हसवड येथे संध्याकाळी ठीक पाच वाजता म्हसवडकर नागरिकांनी मोठ्यासंखेने उपस्थित रहावेअसे आवाहन माजी नगराध्यक्ष विजयकुमार धट यांनी केले आहे