व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) विजयकुमार ढालपे गोंदवले – गोंदवले खुर्द येथील सूरज शिलवंत यास आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या गोंदवले येथील सावकारां विरुद्ध गुन्हा दाखल होऊनही अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे सातारा जिल्ह्यातील तमाम आंबेडकरवादी संघटना पोलिसांच्या निष्क्रियेबाबत चिडून आहेत .आरोपींना तातडीने अटक न केल्यास वंचित बहुजन आघाडी माण तालुकाच्या वतीने ठिकठिकाणी रास्ता रोको करून माण तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असलेचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीदार माण यांना देणेत आले आहे. निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष युवराज भोसले,बहुजन समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी किरण सावंत व तालुका अध्यक्ष शेखर खरात वंचित चे भाऊसाहेब काळोखे,महिला आघाडीच्या सौ रेश्मा शिलवंत,शैलेश शिलवंत,माणिक आवळे,नितीन खरात,अशोक पवार,राजेंद्र आवटे,नगरसेवक रुपेश मोरे,प्रशांत खरात यांच्या सह्या आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने पीडित कुटुंबास भेट देऊन सांत्वन केले व न्याय मिळेपर्यंत सोबत राहण्याचे आश्वासन दिले