वडूज येथे रोजगार मेळाव्यास प्रतिसाद : ग्रामीण भागातील युवक युवतींना मिळाली नियुक्तीपत्रे
व्हिजन २४ तास (संपादक :अहमद मुल्ला )
वडूज :
माण खटाव सारख्या नोकरीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उदात्त हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माण खटाव नेते माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज वडूज येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे तिसरे पर्व होते.
छत्रपती शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज वडूज येथे दिवसभर विविध कंपन्यांचे एच आर ऑफिसर युवक युवतींच्या मुलाखती घेत होते. या ठिकाणी बेरोजगार युवक युवतींना मुलाखतीनंतर ऑन द स्पॉट नियुक्तीपत्रे दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते. यावेळी तब्बल दीड हजार रिक्तपदे नियुक्तीसाठी हा मेळावा संपन्न झाला.
खासदार श्रीनिवास पाटील यांच्याहस्ते यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी २८ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग घेतला होता. ड्रीम फाऊंडेशन, राजश्री शाहू अकादमी, छत्रपती शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज वडूज यांच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास खासदार श्रीनिवास पाटील, प्रभाकर देशमुख, हर्षदा देशमुख महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप, सातारा जिल्हा खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष श्रीराम माने पाटील, सुरेंद्र गुदगे, राष्ट्रवादीचे खटाव तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, नगराध्यक्ष सागर पोळ, राजर्षी शाहू अकादमीचे श्री ठाकरे, दिगंबर पवार, अमोल काटकर यांच्यासह माण खटाव मधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माण खटाव ही भूमी बुद्धिवंत, लढवय्याची भूमी असून इथल्या युवक युवतींच्या उज्वल भविष्यासाठी माण खटावचे नेते प्रभाकर देशमुख सातत्याने प्रयत्नशील आहेत. हल्ली नोकरीच्या संधी मिळणे मुश्कील झाले आहे. अशाही परिस्थतीत परिसरातील युवा वर्गाच्या हाताला काम मिळून युवा पिढी सक्षम व्हावी, या हेतूने प्रभाकर देशमुख यांनी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उचललेले शिवधनुष्य नक्कीच प्रेरणादायी आहे.
श्रीनिवास पाटील, खासदार