व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) कुलदीप मोहिते
वडगाव,( उंब्रज)
वडगाव विकास सेवा सोसायटी चेअरमन पदी ऍड विनायकराव पाटील बापू जनसेवा संघटनेचे, युवा संघटक प्रवीण कदम व व्हाईस चेअरमन पदी दिनकर शिलेवंत यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सदरची निवडणूक सौ थोरात मॅडम सहाय्य्क उपनिभंधक कराड यांच्या नेतृत्वात पार पडली. यावेळी सोसायटी चे सर्व संचालक सभासद ऍड विनायकराव पाटील बापू जनसेवा संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितलं कि स्वर्गीय ऍड विनायकराव पाटील बापू व स्वर्गीय संभाजीराव कदम( आबा) यांच्या नेतृत्व खाली गेली चाळीस वर्ष संस्थेने आदर्शवत काम करून संस्थेची स्वमालकीची भव्य अशी वास्तू दिमाखात उभी केली आहे.
सतत ऑडिट वर्ग अ आहे प्रत्येक वर्षी सभासद सर्व संचालक मंडळ यांच्या प्रयत्नतून 12टके च्या वर लाभांश सभासद यांना दिला जातो. स्वर्गीय बापू व आबा यांनी घालून दिलेल्या मागेल त्याला कर्ज पुरवठा सभासदांचा सर्वांगीण विकास असा आदर्शवत कारभार पार पडला जाईल असे मनोगत निवडीनंतर त्यांनी व्यक्त केले.