माणगंगा नदीपात्रातून शासकीय महसूल बुडविणा-या वाळू चोर व त्यांना अभय देणा-या संबंधीत अधिका-यांवर तातडीने गुन्हे दाखल करा : प्रमोद लोखंडे
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
माण तालुक्यामध्ये माणगंगा नदीपात्रातून राजरोश पणे लाखो ब्रास वाळूचा बेकायदेशिरित्या उपसा करुन कोटयावधी रुपयांचा शासकीय महसूल बुडविणा-या वाळू चोर व त्यांना अभय देणा-या संबंधीत अधिका-यांवर तातडीने गुन्हे दाखल करुन त्यांचेवर कायदेशिर कारवाई करणेबाबतचे निवेदन प्रमोद नंदकुमार लोखंडे, दलित पँथर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांनी जिल्हाधिकारी सो, सातारा यांना दिले आहे
या निवेदनात म्हटले आहे की माण तालुक्यामध्ये माणगंगा नदीपात्रातून दररोज राजरोषपणे बेहिशोबी वाळूचा बेकायदेशिरित्या उपसा करणा-या अनेक टोळ्या असून त्यांना महसूली अधिकारी यांचे अभय आहे. सदर महसुली अधिका-यांच्या या अभयाचा गैरफायदा घेऊन सदरचे वाळू चोर व संबंधीत अधिकारी संगनमताने कोटयावधी रुपयांचा शासकीय महसूल बुडवित आहेत. तसेच सदर माणगंगा नदी पात्रा मध्ये वाळू माफीयांनी महसूली अधिकारी यांच्या आशिर्वादाने वाळू उपसा करणे साठी खूप मोठ मोठे खड्डे काढलेले असून त्या खडयांमुळे पावसाळयामध्ये येणारे नदीचे पाण्यामुळे जिवीत हानीही होणेची दाट शक्यता आहे.