म्हसवड मध्ये अज्ञात चोरट्यांनी टायर दुकान फोडले…

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
सचिन मंगरुळे
म्हसवड प्रतिनिधी
येथील लातूर सातारा महामार्गावर माणगंगा नदीच्या पूलाजवळ असलेल्या माऊली मोटर्स आणि टायर दुकान चोरट्यांनी आज पहाटे फोडून दिड लाख रुपये किंमतीचे टायर लंपास केल्याची घटना घडली.
याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी कि आज मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास लातूर सातारा महामार्गावर म्हसवड शहरापासून सातारच्या दिक्षेकडे जाताना दोन कि मी अंतरावर असणाऱ्या माऊली मोटर्स आणि टायर्स नावांचे दुकान आहे. या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करुन दिड लाख रुपये किंमतीचे चार चाकी वाहनांचे टायर लंपास केल्याची घटना उघडकीस आली. दुकानदारांने आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता स्वीप्ट कार मधून आलेले चार ते पाच अनोळखी व्यक्ती तोंडाला मास्क हातात हॅन्डग्लोज घालून आल्याचे दिसून येतात असे दुकानाचे मालक संतोष नरळे यांनी सांगितले.
सदर चोरीचा गुन्हा उघडकीस येणेसाठी सातारा पोलिस दलातील श्वान व ठसे तज्ज्ञ पथक आज दाखल झाले या पथकातील श्वानाने सातारच्या दिशेने चोरटे गेल्याचा माग दाखवला आहे.
तरी गत दोन महिन्यात शहर व परिसरातील अनेक नागरीकांची घरे चोरट्यांनी लक्ष केले आहेत. यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्यामुळे म्हसवड पोलिसांनी या चोरीच्या घटनांचा सखोल तपास सुरु करुन शहर व परिसरातील नागरीकांच्यात घबराटीचे वातावरण पसरलेले आहे ते दुर करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी नागरीकातून
होत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!