शिंगणापुरात अज्ञात चोरट्यांनी प्राथमिक शाळा फोडली.. दीड लाखाचे शैक्षणिक साहित्य लांबविले

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
आनंद बडवे
शिखर शिंगणापूर—:
             शिंगणापूर ता. माण येथील बनवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे दरवाजा तोडून सुमारे 1 लाख 41 हजार रुपये किमतीचे संगणक साहित्य व इतर इलेक्ट्रॉनिक शैक्षणिक साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. सोमवारी शाळेत आल्यानंतर सदरचा चोरीचा प्रकार शिक्षकांच्या निदर्शनास आला. याबाबतची तक्रार  दहिवडी पोलिसांत दाखल केली आहे. 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंगणापूर गावापासून निर्जनस्थळी  उमाबन परिसरात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. अज्ञात चोरट्यांनी शाळेतील मुख्याध्यापक कार्यालयाचे दरवाजे तोडून शाळेतील शैक्षणिक साहित्य लंपास केले. यामध्ये दोन संगणक संच, प्रिंटर, स्पीकर माईक, युपीएस, सौरऊर्जा बॅटरी, सौरऊर्जा मशीन, स्मार्ट टीव्ही असे 1 लाख 41 हजार रुपयांचे इलेक्ट्रॉनिक शैक्षणिक साहित्य घेऊन चोरट्यानी पलायन केले.
 सोमवारी शाळा सुरू झाल्यानंतर सदरच्या चोरीचा प्रकार शिक्षकांच्या निदर्शनास आला असून शुक्रवारी ते रविवारी या सुट्टीच्या काळात सदरचा प्रकार झाल्याचा अंदाज आहे. याबाबतची तक्रार शाळेच्या मुख्याध्यापकांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिली आहे. दहिवडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याकामी तपासासाठी श्वानपथक तसेच फिंगर प्रिंट पथक पाचारण करण्यात आले होते. पुढील तपास मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जे एस दोलताडे करत आहेत.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!