माण-खटावच्या विकासासाठी एकजुटीचा निर्धार — पानवण सरपंच पती डॉ. नानासो शिंदे यांचा भाजपात जाहीर प्रवेश
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड प्रतिनिधी – अहमद मुल्ला
म्हसवड (ता. माण) –
माण-खटाव विधानसभा मतदारसंघात विकासाची नवी दिशा देणाऱ्या ग्रामविकास व पंचायतराज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पानवण गावच्या सरपंच सौ. जयश्री नाना शिंदे यांचे पती डॉ. नानासो आण्णा शिंदे, तसेच श्री. रामू कुटे, श्री. संजय किसन शिंदे आणि अनेक मान्यवरांनी आज दि. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी बोराटवाडी (ता. माण) येथे भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
या पक्षप्रवेश सोहळ्यात मा. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे हार्दिक स्वागत करत म्हटले —
> “माण-खटावचा सर्वांगीण विकास हे आपले ध्येय असून, गावागावात पायाभूत सुविधा, जलव्यवस्था, आणि ग्रामविकास योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एकजुटीने काम करण्याची वेळ आली आहे.”
पक्षप्रवेश सोहळ्यात लोणारी समाज राष्ट्रीय कार्यकारणी संचालक श्री. गोरखनाथ शिंदे, वळई गावचे सरपंच श्री. बबन काळे, तसेच स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रवेशामुळे पानवण आणि परिसरात भाजपला नवीन बळ मिळाले असून, गावपातळीवर विकासाभिमुख राजकारणाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
“एकत्र येऊया – माण-खटावचा विकास घडवूया!”

