ओगलेवाडी येथे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते कराड

ओगलेवाडी कराड येथे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन शनिवार दिनांक 21/12/2024 रोजी पक्ष प्रमुख .उध्वजी ठाकरे साहेब व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक .दगडुदादा सपकाळ , शिवसेना उपनेते व पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख .नितीनजी बानगुडे पाटील यांच्या सुचनेनुसार भारताचे गृहमंत्री .ना . अमित शहा यांनी संसदेत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल जे अप शब्द वापरले त्यांच्या विरोधात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष कराड उत्तर चे वतीने ओगलेवाडी चौक येथे शिवसेना तालुकाप्रमुख .संजय भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले

याप्रसंगी भा. ज . पा .च्या विरोधात घोषणा देण्यात आल्या व अशा वाच्याळ विरांचा भा .ज .पा .च्या वरीष्ठ नेत्यांनी यांचा बंदोबस्त करावा कारण हे लोक वारंवार श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांच्या सारख्या महान व्यक्ती यांच्या वर कायम गरगर ओकत असतात तरी मा.ना .आमित शहा यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी तसेच मुंबई येथे मराठी कुटुंब्यावरती परप्रांतीयांनी केलेल्या हाल्याचा सुध्दा यावेळी निषेध करण्यात आला तसेच ईथुन पुढील काळात आम्ही परप्रांतीय लोकांचे आसले लाड सहन करणार नाही व या सर्व लोकांना शिवसेना स्टाईलने आंदोलन करुन उत्तर दिले जाईल असा इशाराही देण्यात आला

या प्रसंगी उपस्थित शिवसेना उपतालुकाप्रमुख .मनोज गायकवाड, विशाल कदम, युवा सेना अधिकारी विक्रम पिसाळ, अशोक अंगरखे, गणेश जांभळे, तानाजी चंन्ने, संतोष संकटे, सुभाष शिलवंत, साळुंखे,निवास विर, महेश कांबळे, नारायण शिलवंत व शिवसैनिक उपस्थित होते


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!