दिनांक.२२/०२/२०२४ रोजी, सकाळी १० ते ०४ पर्यंत, आटपाडी पंचायत समिती मधील श्रीमंत बाबासाहेब देशमुख सभागृह येथे माहिती अधिकार संदर्भात जनहितार्थ प्रशिक्षण आयोजित केले आहे.
संपादक शाहीन शेख माहिती अधिकार व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटक तहसीलदार मा.श्री.सागर ढवळे साहेब असून प्रमुख पाहुणे मा. श्री. मुक्तेश्वर माडगूळकर (गटविकास अधिकारी पं. स. आटपाडी) व पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश गायकवाड साहेब असून सदर कार्यशाळा ही मोफत आहे. या कार्यशाळेला सर्व लोकांनी विद्यार्थी, पालक, कामगार, शेतकरी, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते, महिला वर्ग यांनी उपस्थित राहावे व माहिती अधिकार त्यासंदर्भात सखोल मार्गदर्शन मिळणार असून या कार्यक्रमाचे आयोजन सम्यक सेवाभावी संस्था, दिघंची. अध्यक्ष दत्तात्रय जावीर साहेब व मा.श्री दत्तात्रय हातेकर व मा.श्री संतोष रणदिवे (माहिती अधिकार कार्यकर्ते) यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचा हेतू व्यापक असून सर्वसामान्य नागरिक याला केंद्रबिंदू ठेवून नागरिकांचे हक्क व अधिकार याची जनजागृती जनमानसात व्हावी या उद्देशाने प्राथमिक माहिती अधिकार प्रशिक्षण कार्यशाळा लोकांच्या वैचारिक जडणघडणीमध्ये मोलाची ठरेल.