उंब्रज पोलीस स्टेशन व तळबीड पोलीस स्टेशन यांची संयुक्त कामगिरी दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्यां टोळीला केले जेरबंद उंब्रज व तळबीड पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते उंब्रज

    लोकसभा 2024 निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा पोलीस यंत्रणेला जिल्ह्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रात्रग्रस्त पेट्रोलिंग करण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान तळबीड पोलीस ठाणे प्रभारी किरण भोसले, पोलीस कॉन्स्टेबल विभूते, चालक पोलीस कॉन्स्टेबल पाटील यांना दिनांक 16/05/2024 रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना उंब्रज गावच्या हद्दीमध्ये शिवडे या गावाजवळील कृष्णा फुलाच्या अलीकडे रोडच्या बाजूस अंधारात 5 इसम संशयित रित्या हालचाल करताना आढळून आले. तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले तळबीड यांनी उंब्रज पोलीस ठाणे प्रभारी भोरे यांना संपर्क करून घटनास्थळी मदतीसाठी बोलून घेतले. त्या पाच संशयितांना घेराव घालून पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यातला एकाला अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यश आले .

     सदर संशयित इसमांकडे सखोल चौकशी व झाडाझडती केली असता, 3 लहान मोठ्या कटावणी 2) 4 जिलेटिन कांड्या 3) डेटोनेटर 4) लहान बॅटरी )5) एक् सा ब्लेड, करवत, कोयता, ब्लास्टिंग ची वायर, दोन मोटरसायकल ,असे एकूण 137980( एक लाख 37 हजार 980 )रुपयांचे सामान मिळून आले. सदर इसमांकडे सखोल चौकशी केली असता गेल्या आठ दिवसापासून मसूर येथील हिताची कंपनीचे एटीएम सेंटर जेलेटिन कांड्यांद्वारे द्वा स्पो ट घडवून आणून दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे सदर इसमांनी सांगितले. सदर एटीएमची ते चार-पाच दिवसापासून रेखी करत होते ठरल्याप्रमाणे आज ते दरोडा टाकणार होते परंतु उंब्रज पोलीस स्टेशन व तळबीड पोलीस स्टेशन यांच्या सतर्कतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला.

       ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांची नावे खालील प्रमाणे आहेत 1) वैभव राजेंद्र साळुंखे वय ते 33 2) ओकार बाळासाहेब साळुंखे वय 23 3) आदित्य संतोष जाधव वय 19 राहणार मोळाचा ओढा, सातारा 4) विधी संघर्ष बालक 5) पळून गेलेल्या इसमाचे नाव माहीत नाही यांच्यातील वैभव साळुंखे यांच्यावर कोरेगाव, वडूज पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत .पळून गेलेल्या इसमाची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून चालू आहे.

   सदरची कारवाई ही सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाईमध्ये तळबीड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले पोलीस कॉन्स्टेबल विभूते. पोलीस कॉन्स्टेबल चालक तळबीड पाटील ,तसेच उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोरे पोलीस कॉन्स्टेबल साळे, पोलीस कॉन्स्टेबल माने, पोलीस हवलदार धुमाळ हे सामील होते उंब्रज व तळबीड पोलीस ठाण्याच्या संयुक्त कामगिरीचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अभिनंदन केले आहे सदर गुन्ह्याचा तपास हे उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोरे करत आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!