वरकुटे–मलवडी येथे दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, गुन्हा दाखल

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड | प्रतिनिधी :-
वरकुटे–मलवडी (ता. माण, जि. सातारा) येथे भरधाव वेग आणि निष्काळजी वाहनचालनाामुळे भीषण अपघात होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास निवृत्ती दादु यादव यांच्या घराजवळ, पंढरपूर–मल्हारपेठ जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर हा अपघात झाला. संतोष रघुनाथ पोळ (वय ५०, रा. वरकुटे–मलवडी) हे त्यांच्या हिरो होंडा पॅशन प्रो दुचाकीवरून शेनवडी बाजूकडून येत असताना, समोरून ऋषीकेश रविंद्र गोंजारी (रा. दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली) हे त्यांच्या होंडा युनिकॉर्न (MH14 HC 4014) दुचाकीवरून भरधाव वेगात आले. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालविल्याने दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या अपघातात संतोष पोळ यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला, तर फिर्यादी अर्जुन सर्जेराव यादव व आरोपी ऋषीकेश गोंजारी यांना किरकोळ दुखापत झाली. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी फिर्यादी अर्जुन सर्जेराव यादव (वय ४९, व्यवसाय शेती, रा. वरकुटे–मलवडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी ऋषीकेश रविंद्र गोंजारी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 106, 281, 125(a), 125(b), 324(4) तसेच मोटार वाहन अधिनियम कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा क्रमांक 13/2026 असून दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी पहाटे २.२० वाजता नोंद करण्यात आली.

या घटनेचा तपास सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जी. डी. लुबाळ हे करीत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *