मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अवघ्या सहा तासांत अटक उंब्रज पोलिसांची जलद व परिणामकारक कारवाई

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
प्रतिनिधी: श्रीकांत जाधव
उंब्रज, ता. १३ जून:
उंब्रज पोलिसांनी एका जबरी चोरी प्रकरणात अवघ्या सहा तासांत आरोपींना अटक करून चोरीस गेलेला मोबाईल व रोख रक्कम जप्त करत प्रभावी कारवाई केली आहे. 

दिनांक १० जून २०२५ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास श्रीकांत गोपु राठोड (वय ४५, व्यवसाय मुकादम, रा. वाठार किरोली, ता. कोरेगाव, जि. सातारा) हे उंब्रज येथील पाटण तिकाटणे बोगद्यानजीक आले असताना, आकाश संतोष आटोळे व अमोल रमेश चव्हाण (दोघेही रा. लक्ष्मीनगर, उंब्रज) यांनी त्यांच्याकडे लिफ्टची मागणी केली. फिर्यादी यांच्या मोटारसायकलवर बसून आरोपींनी वरद विनायक मंगल कार्यालयाच्या पुढे, नदीकाठी अंधारात त्यांना थांबवले व त्यांना मारहाण करत, जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील मोबाईल फोन व ₹२०,००० रोख रक्कम असा एकूण ₹३४,००० चा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला.

फिर्यादीने तात्काळ उंब्रज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजि. क्र. २७६/२०२५, भा.दं.सं. नविन कलम BNS ३०९(६) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक (प्रभारी) रविंद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले.

केवळ सहा तासांत तपास पथकाने आरोपींचा छडा लावत त्यांना ताब्यात घेतले व चोरीस गेलेला मोबाईल व रोख रक्कम हस्तगत केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, तसेच कराड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश भोसले, पो. ह. संजय धुमाळ, युवराज पवार, दिनेश भोसले, पो. कॉ. निलेश पवार, मयूर थोरात, राजू कोळी, मधुकर मांडवे, प्रशांत पवार यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. आरोपींचा शोध घेण्यास पुसेगाव पोलिसांचीही मदत झाली.

गुन्ह्याचा पुढील तपास पो.उ.नि. गणेश भोसले हे करत आहेत 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!