व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) विजयकुमार ढालपे गोंदवले प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिंडवाडी ता.सातारा या शाळेतील पदवीधर शिक्षक श्री.तुकाराम दगडू मुळीक सर यांच्या सेवानिवृत्त सत्कार कार्यक्रम दैवज्ञ मल्टीपर्पज हॅॉल समर्थ मंदिर सातारा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सदर कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा परिषदचे मा.शिक्षणाधिकारी वामनराव जगदाळे अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाहुवाडी जिल्हा कोल्हापूर येथील न्यायाधीश श्रीम.श्रध्दा बागल होत्या. यावेळी बोलताना जगदाळे पुढे म्हणाले मुळीक सर यांची दोन्ही मुले तेजस, वैभव व सुस्ना सौ.कोमल ही देखील उच्च विद्याभूषित आहेत याचे कारण सरानी समाजातील तळागाळातील लोकांच्या मुलांना तळमळीने अध्यापन करुन घडवीले आहे.शिक्षक जेव्हा प्रामाणिक शिक्षण सेवा बजावत तेव्हा त्यांची मुले देखील उच्च शिक्षण घेतात हे उदाहरण मुळीक सरांच्या बाबतीत सत्य आहे. सदर कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिंडवाडी येथील शाळा समिती मार्फत घेण्यात आला होता. यावेळी खिंडवाडी शाळेचे मुख्याध्यापक लोहार सर,बी.व्ही.कदम सर, भिमराव देवकर सर,जाधव सर चिमणराव गोटा, बाळासाहेब जगताप कालठण, कांबळे सर,विशाल कणसे संचालक शिक्षक बँक सातारा, अनिल चव्हाण सर, संतोष घोडके माण तालुका शिक्षण समितीचे अध्यक्ष, गोंदवले गावचे उद्योगपती संजय पोळ गोंदवले गावचे उपसरपंच अमोल पोळ व मुळीक सर यांचा मुलगा तेजस, वैभव व सुष्ना सौ.कोमल आदिनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते मुळीक संराचे मामा श्री.विजय चव्हाण सर यांनी सन्मानपत्र दिले. प्रास्ताविक लोहार सर यांनी केले तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक बँकेचे मा.व्हा.चेअरमन हणमंत राव जगदाळे यांनी केले आभार विजय चव्हाण सर यांनी मानले.