परमात्माच्या ओळखीनंतरच खऱ्या भक्तीला प्रारंभ..!* *- सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज.*
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
गणेश मिंड
इंदापूर (प्रतिनिधी)
प्रभू परमात्मा ला कोणत्याही नावाने पुकारले जात असले तरी ब्रह्मज्ञानाद्वारे त्याची ओळख करून घेतल्यानंतरच खऱ्या भक्तीला प्रारंभ होतो असे प्रतिपादन संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांनी केले.
महाराष्ट्राचा 57 वा निरंकारी संत समागम नागपूर येथे आयोजित केला होता; त्या प्रसंगी सद्गुरु माताजी या आपल्या अनुयायांना भक्तीचा मार्ग समजून सांगताना अमूल्य मार्गदर्शनपर बोलत होत्या.

सद्गुरु माताजी आणि निरंकारी राज पिताजी यांच्या उपस्थितीत आयोजित तीन दिवसीय भव्य-दिव्य संत समागम कार्यक्रम नागपूर येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देश विदेशातून लाखोंचा जनसागर लोटला होता या जनसागरात इंदापुर व परिसरातील दोन हजाराहून अधिक निरंकारी अनुयायांचा सहभाग लाभला होता.
माताजी संबोधित करत असताना पुढे म्हणाल्या, निराकार परमात्मा सर्वत्र सामावलेला आहे. अनंत व सर्वव्यापी सर्वदूर असणाऱ्या परमात्म्याचा बोध झाल्यानंतर त्याच्याशी आपली भावनात्मक एकरूपता साधली जाते. तेव्हा आपल्यामध्ये स्वाभाविकपणेच मानवी गुणांचा समावेश होतो असे त्या म्हणाल्या.


