15ऑगस्ट निमित्त सहारा उद्योग समूहाच्या वतीने वृक्षारोपनाचा कार्यक्रम
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक अहमद मुल्ला )
म्हसवड
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून 15ऑगस्ट रोजी सहारा उद्योग समूहाच्या वतीने वृक्षारोपनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला*
भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण झाली. या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सहारा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अजीम तांबोळी यांनी बरीच वर्षे वृक्षांशिवाय असणाऱ्या म्हसवड एस टी स्टँड परिसरात असणाऱ्या दुभाजकावर वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. हे वृक्षारोपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचा सहभाग होता अशा स्वातंत्र्य सेनानींच्या कुटुंबियांच्या हस्ते घेण्यात आला.तसेच म्हसवड पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी अधिकारी व लोकशाही चा चौथा स्तंभ असणारे सर्व पत्रकार बांधव यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.
सतत दुष्काळी असणारा माण तालुका दुष्काळाच्या झळा जेवढ्या आपल्या तालुक्याने सोसल्या तेवढ्या कोणीच सोसल्या नाहीत. दरवर्षी मेघराजा आपल्याला पाठ दाखवतो. दुष्काळ आणि आपण हे फार जवळचे नाते, या दुष्काळावर मात करायची असेल,इथला बळीराजा सुखावला पाहिजे यासाठी झाडे लावली पाहिजेत. निसर्गाचे समतोल राखले पाहिजे. निसर्गाचे समतोल राखण्यासाठी झाडे जगवली पाहिजेत जोपासली पाहिजेत. हा मंत्र डोक्यात ठेवून अजीम भाई यांनी वृक्षारोपण करण्याचे ध्येय ठेवले व आजच्या पवित्र दिनी ते अमलात आणले.

या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी माजी स्वातंत्र्य सेनानी कै.आप्पासाहेब दहीवडे यांचे नातू पपेश दहीवडे,म्हसवड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी, म्हसवड नगरपरिषदेचे मुख्य अभियंता चैतन्य देशमाने साहेब, म्हसवड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बंडू धट, पुकळे कॉर्नर चे सर्वेसर्वा युवानेते आप्पासाहेब पुकळे,प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. रमेश काटकर,राष्ट्रीय काँग्रेस चे विश्वंभर बाबर सर, सन्मती सेवा दलाचे सदस्य सचिन देशमाने, डॉ.राजेश शहा,बाळासाहेब पिसे,बाबु मुल्ला, आतुल गोरड,ज्येष्ठ पत्रकार विजय टाकने,महेश कांबळे,एल.के. सरतापे, उमेश बुधावले,प्रवीण राजे,नागनाथ डोंबे, रफीक तांबोळी, मेजर गुलाब शेख , मेजर दिलीप नरळे,समर्थ जाधव, तुळशीराम गोरडं, सूरज कर्माळकर, मुद्दाम मुल्ला व मित्र परिवार उपस्थित होते.