सडावाघापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी पोलीस ॲक्शन मोडमध्ये 36 हजाराचा दंड वसूल
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
सडावाघापूर पाटण:
सर्वत्र प्रसिद्ध असलेला पाटण तालुक्यातील पाटण तारळे रस्त्यावरील सडा वाघापूरचा उलटा धबधबा सध्या पावसामुळे ओसंडून वाहू लागला आहे. हा उलटा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक सडा वाघापूरला दाखल होऊ लागले आहेत. यावर्षी ही संख्या वाढली असून सुट्टी दिवशी बहुसंख्य प्रमाणात पर्यटक सडा वाघापूरला हजेरी लावतात.
दरम्यान या पर्यटकांमध्ये हुल्लड बाजी करणाऱ्या तरुणाईचा मोठा भरणाआहे.रस्त्यावर नाचणे पठारावर हॉर्न वाजवत गाड्या फिरवणे, गाडीतील टेप रेकॉर्डरलावून धिंगाणा घालणे या प्रकारची हुल्लडबाजी सडा वाघापूरला मोठ्या प्रमाणात वाढली आहे याचा पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत .आहे.
याच पार्श्वभूमीवर पाटण पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत पोलिसांच्या वतीने हुल्लड बाजारांवर करडी नजर राहणार असून पाटण पोलिसांच्या वतीने सडा वाघापूर परिसरात बंदोबस्त लावण्यात आलाआहे. अशी माहिती मल्हार पेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी वेतन मछले यांनी दिली आहे आपल्या हुल्लडबाजीने पर्यटन स्थळाला गालबोट लावू नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले.आहे.



