आजचे युग स्पर्धेचे असून स्पर्धेत जिद्द,चिकाटी व प्रचंड मेहनत घेऊन स्पर्धेत यश मिळवा : अश्विनी शेंडगे

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
           आजचे युग स्पर्धेचे असून स्पर्धेत जिद्द,चिकाटी व प्रचंड मेहनत घेऊन स्पर्धेत यश मिळवणेचे आव्हान माण खटावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी विरकरवाडी येथे विद्यार्थी व पालकांना केले.
                 श्री.भंडारा सेवा यांच्या वतीने विरकरवाडी ता-माण येथे शालेय कबड्डी व प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न झाल्या.श्री.नागोबा यात्रेच्या निमित्ताने दि-३०/१२/२०२३ ते दि-४/१/२०२४ अखेर आदर्श जि.प.शाळा विरकरवाडीच्या भव्य क्रीडांगणावर तालुका स्तरीय शालेय कबड्डी व प्रश्नमंजुषा स्पर्धा श्री.भंडारा सेवा मंडळ व विरकरवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने उत्साहात पार पडल्या.या कार्यक्रमाचा सांगता समारंभ दि.४/१/२०२४ रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरणाने पार पडल्या.या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी मा.आश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी माण-खटाव,मा.श्री.विजयकुमार कोकरे,अधिव्याखाता,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,फलटण,मा.श्री.लक्ष्मण पिसे गटशिक्षणाधिकारी,माण,मा.श्री.मुकेश सजगाणे,अतिरिक्त गटविकास अधिकारी,सिंधुदुर्ग, मा.श्री.अजय चव्हाण अभियंता,सर्व शिक्षा अभियान पं.स.माण,मा.श्री.जगन्नाथ विरकर माजी केंद्रप्रमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
           तालुका स्तरावरील शालेय कबड्डी स्पर्धेचे प्रथम तीन व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे लहान व मोठा गट प्रत्येकी तीन क्रमांक काढून त्यांना रोख रक्कम,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.यावेळी .आपल्या अध्यक्षीय भाषणात मा..शेंडगे मैडम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी या वयापासून तयारी करावी असे सांगितले.त्यांनी स्वताचा जीवनप्रवास सांगितला.आजकालची मुले रिअल लाइफ पेक्षा रिल लाइफच्या पाठीमागे धावतात हि खंत व्यक्त केली.पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना अनेक अनुभव येतात.नात्यांची किमत कमी होताना पाहते त्यावेळी दुख होते.यासाठी या वयापासून विध्यार्थ्यांमध्ये मुल्यांची रुजवनूक व्हावी हि अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.विरकरवाडी हे अधिकाऱ्याचे गाव म्हणून आपण ओळखतो.तरीही यापुढील काळात पुरुषांबरोबर महिलांनीही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश संपादन करावे व महिलानी सक्षम व्हावे हि अपेक्षा त्यानी व्यक्त केली
            .मा.कोकरे साहेब यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले कि,विद्यार्थ्यांनी या वयापासूनच स्पर्धेला सामोरे गेले पाहिजे.कारण हे जग स्पर्धेचे आहे.यासाठी श्री.भंडारा सेवा विरकरवाडी यांनी जो उपक्रम आयोजित केला तो स्तुत्य आहे.मा.श्री.पिसे साहेब यांनी विद्यार्थ्यांनी खेळाच्या माध्यमातून आपला,गावचा नावलौकिक वाढवावा असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.  यावेळी आदर्श जि.प.शाळा,विरकरवाडी,न्यू इंग्लिश स्कूल विरकरवाडी मधील विविध स्पर्धेत व परीक्षेत यश प्राप्त केलेल्या गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रश्नमंजुषा लहान व मोठा गट विजेत्या शाळा अनुक्रमे जि.प.शाळा लांबमळा,जि.प.शाळा गोसावीवस्ती,जि.प.शाळा अंधरवडवाडी,महात्मा गांधी विद्यालय दहिवडी,जय भवानी विद्यालय पाचवड,दानवलेवाडी विद्यालय यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
             कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.डॉ.प्रमोद गावडे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय श्री.मुकेश सजगाणे यांनी करून दिला.यावेळी मेजर मोहन विरकर,श्री.जगन्नाथ विरकर,श्री.संतराम पवार सर,श्री.रुपचंद बोराटे सर यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.किरण बोराटे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री.भंडारा सेवा सर्व पदाधिकारी ,सर्व ग्रामस्थ,विरकरवाडी,आदर्श जि.प.शाळा विरकरवाडी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी विशेष प्रयत्न केले.शेवटी मेजर श्री.मोहन विरकर सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता झाली

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!