पाऊले चालली पंढरीची वाट म्हणत आज मोठ्या मनो भावे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केलं

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
विजय ढालपे
गोदवले –

       श्रीराम जयराम जयजय राम च्या नाम घोषात हजारो वारकऱ्यांसह श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या पायी दिंडीने आज सकाळी आषाढी वारीसाठी पंढरपुरकडे प्रस्थान ठेवले.

       त्यावेळी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पंढरपुरचे विठ्ठल-रुक्मीणी हे श्रीं ब्रम्हचैतन्य महाराजांचे कुलदैवत असल्याने आषाढी वारी ते नेहमी करत.श्रींच्या पश्चात आजही हा पायी दिंडी सोहळा अविरतपणे सुरु असल्याने साताऱ्यासह सांगली,कोल्हापुर,पुणे,नगर जिल्ह्यातील असंख्य भाविक या दिंडीमध्ये आवर्जुन सहभागी होतात.येथील समाधी मंदीर समिती व समस्त वारकरी मंडळाच्या वतीने दरवर्षी या दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते.श्रींची दिंडी आज पंढरीकडे निघणार असल्याने हजारो भाविक कालपासुनच गोंदवल्यात दाखल झाले होते.आज सकाळी नऊच्या सुमारास श्रींच्या समाधी मंदीरात आरतीनंतर श्रींच्या पादुका व प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले.त्यानंतर भाविकांनीश्रीनामाचा एकच जयघोष केला.फुलांनी सजविलेल्या भव्य रथामध्ये समाधी मंदीर समितीच्या विश्वस्तांच्या हस्ते पादुका व प्रतिमा विराजमान करण्यात आल्या.अन् पुन्हा विठु माऊलीच्या जयघोषाने मंदीर परिसर दणाणुन गेला.श्रींच्या जयघोषातच भगव्या पथाका झेंडे घेऊन वारकरी मोठ्या आनंदाने मनोभावे ग्रामप्रदक्षिणेसाठी जाऊन ग्राम प्रदक्षिणा पूर्ण केली यावेळी राम मंदिराच्या पुढे महिलांनी फुगड्या घातल्या व गोंदवलेकर ग्रामस्थांनी पालखीला निरोप दिला पालखी गोंदवले खुर्द मध्ये आल्या नंतर पालखीतील सर्व भाविकाना अल्पोपहार आणि मसाला दूध देण्यात आल.सध्या पालखीत सातारा जिल्ह्यासह लांब लांब चे भाविक दाखल झालेले आहेत आज पालखीचा पहिला मुक्काम सिध्दनाथाच्या म्हसवड मध्ये होणार आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!