स्वर्गीय चंद्रकांत कृष्णाजी गोरवे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमीत्त वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
बिजवडी:
शालेय शिक्षण घेत असताना प्रतिकूल परिस्थितीत शैक्षणिक आबाळ होऊ नये म्हणून होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण समारंभ नुकताच येथे पार पडला. स्वर्गीय चंद्रकांत कृष्णाजी गोरवे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमीत्त कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय बिजवडी येथे श्री सचिन चंद्रकांत गोरवे यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गरजू सहाय्य या उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते.
शिक्षण हे भाकरी, चाकरी वा नोकरी मिळवण्यासाठी नसून आयुष्य समृद्ध करण्याचा मार्ग आहे. या मार्गावरील वंचित विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी सचिन गोरवे यांच्याकड़ून केले जाणारे प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे शाळेचे मुख्याध्यापक बी. एस. सावंत म्हणाले.
तत्पूर्वी स्वर्गीय चंद्रकांत कृष्णा गोरवे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमीत्त ह.भ.प. राधाताई रेपे महाराज आळंदीकर यांचे कीर्तन झाले. परमेश्वर प्राप्तीकरिता विषयसुखाची आसक्ती टाळून नामस्मरण करावे, असे मार्गदर्शन आळंदीकर यांनी यावेळी केले.
कार्यक्रमप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक योगेश बोराटे, इमेज मिड़ीया संस्थेचे श्रीकांत सुर्यवंशी, स्टेट बँक ऑफ इंडिया मंचरचे शाखाधिकारी संदीप वैद, पत्रकार विशाल केदारी, राजवडी गावचे माजी सरपंच तानाजी भोसले, मिलिंद कुंभार, ह.भ.प. शामराव भोसले, ह.भ.प. अक्षदा जगताप आळंदीकर, ह.भ.प. सुप्रिया चांगुणे, सुरज जाधव, उमेश गुळीक, हरीदास निंबाळकर यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.