ओबीसींच्या शैक्षणिक आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून रोखठोक भूमिका घेणार : इंजि.सुनील पोरे

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक: अहमद मुल्ला )
म्हसवड 
        सातारा शहरासह जिल्ह्यातील शिंपी समाजातील बांधव, भगिनी व युवकांनी एकत्र येवून आपल्या अडचणी मांडाव्यात. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण वेळोवेळी कळीचा मुद्दा बनत चालला असताना भविष्यात शैक्षणिक आरक्षणालाही धक्का लागू नये, यासाठी चळवळ उभी करुन रोखठोक भूमिका  घेणार असल्याची माहिती नासपचे जिल्हाध्यक्ष इंजि.  सुनील पोरे यांनी दिली.
नामदेव समाज उन्नती परिषद, सातारा (नासप) जिल्ह्याच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यानंतर संत नामदेव शिंपी समाज नामदेव मंदिर ट्रस्ट, सातारा यांच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी नासपचे राज्याध्यक्ष संजीव तुपसाखरे, पदाधिकारी अजय फुटाणे, संजय नेवासकर, रविंद्र रहाणे, बाळकृष्ण आंबेकर, विलास बारटक्के, चंद्रकांत शेळके, श्रीकांत आंबेकर उपस्थित होते.
              यावेळी बोलताना इंजि.सुनील पोरे म्हणाले, जिल्ह्यात शिंपी समाजाचे मोठे काम आहे. मात्र समाज एका छताखाली नसल्याने मरगळ आली आहे. आपली जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर केवळ हार-तुरे स्वीकारत बसणार नसून इमानेइतबारे भरीव काम करणार आहे. यासाठी तालुका निहाय दौरे सुरु असून समाज बांधवांच्या अडीअडचणी समजून घेत आहे. लवकर जिल्ह्यात समाज बांधवांनी एकत्र येण्यासाठी मेळावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
               संजीव तुपसाखरे म्हणाले, एकीची मोठी ताकत असते. यासाठी संघटना सक्षम असली पाहिजे. संत नामदेव महाराजांचे कार्य असामान्य आहे. मात्र, अद्याप त्यांचे भव्य असे स्मारक नाही. यासाठी राज्य पातळीवर प्रयत्न करणार आहे.
या कार्यक्रमाचे  प्रमोद बेंद्रे यांनी सूत्रसंचलन केले. दीपक खांडके यांनी आभार मानले. यावेळी नामदेव हेंद्रे, धनंजय बारटक्के, सतीश वेल्हाळ, धनंजय हेंद्रे, मनोज महाडीक, सुनील हेंद्रे, गणेश कुबडे, रवी बोधे, प्रकाश अवसरे, सुनील कारंजक यांच्यासह समाजबांधव मोठ्या संखेने  उपस्थित होते.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!