जन्मजात दारिद्र्यावर विजय मिळविण्यासाठी संस्कारमय शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही : प्रा.आर.एस.चोपडे.
.
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक: अहमद मुल्ला )
म्हसवड –
जन्मजात मिळालेल्या दारिद्र्यावर विजय मिळविण्यासाठी संस्कारमय शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे स्पष्ट मत महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीचे चेअरमन प्रा.आर.एस.चोपडे सर यांनी व्यक्त केले.
ते म्हसवड ता.माण येथील ज्ञानवर्धिनी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी विद्यार्थी -शिक्षक -पालक सहविचार सभेत मार्गदर्शनपर बोलत होते.
या सहविचार सभेसाठी म्हसवड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष दिपक बनगर,पत्रकार महेश कांबळे,संस्थेचे संचालक लुनेश विरकर, प्राचार्य जी.डी.मासाळ,जेष्ठ शिक्षक आर.टी.काळेल,एन.आय.एस.कोच महालींग खांडेकर,आदीसह शिक्षक,पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुमारे दोनशे हून अधिक पालकांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमांच्या सुरुवातीला गणेशोत्सवा निमित्त विद्यालयात घेतलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी क्रीडा स्पर्धेत सुयश संपादन करणार्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

पालक सभेला संबोधित करताना प्रा.चोपडे सर यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका, जीवनविद्येच्या ज्ञानाचे सार असणार्या विश्वप्रार्थनेचे महत्व व हीरक महोत्सवी सांगता समारंभ कार्यक्रमाचे निमंत्रण आदी विषयांवर पालकांना सखोल मार्गदर्शन केले.विद्यालय राबवित असलेल्या विविध उपक्रमांचे चेअरमन साहेबांनी विशेष कौतुक केले.
प्रास्ताविक प्राचार्य श्री.जी.डी.मासाळ यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.संध्या विरकर यांनी केले तर आभार जेष्ठ शिक्षक श्री.आर.टी.काळेल यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.