गटारीचे  आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन दुरूस्तीचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याची आग्रही मागणी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
By :दिलीपराज किर्तने
 म्हसवड ( प्रतिनिधी) 
श्री सिद्धनाथ मंदिरा मागील बाजूस गुरव गल्लीमध्ये गटारीचे आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन दुरुस्तीचे अर्धवट राहिलेले काम तातडीने पूर्ण करण्याची आग्रही मागणी करणारे, लेखी निवेदन नगरपरिषदेला देण्यात आले आहे.
लेखी निवेदनातील मजकूर असा,,येथील श्री सिद्धनाथ मंदिरा मागील गुरव गल्लीत आम्ही खाली सह्या करणारे सर्वजण गेली कित्येक वर्षे म्हसवड शहराचे रहिवाशी आहोत.या ठिकाणी ,नगरपरिषद. हद्दीमध्ये गटारीचे व पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन चे काम, सुमारे सहा महिने झाले तरी जैसे थे च आहे.नेते,पुढारी,नगरसेवक आदींच्या कानावर ही बाब घालून,सर्व वस्तुस्थिती समक्ष दाखवून सुद्धा केवळ आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही. अनेक वेळा ठेकेदार संतोष भोसले यांना सांगितले पण ते आज करतो,,,उद्या करतो असे सांगून टाळाटाळ करतात पण काम करत नाहीत आणि जवळ पास प्रत्येकाच्या घरामध्ये आजारी पेशंट आहेत. गटारीचे काम न केल्याने काही दुर्घटना वारंवार घडत आहेत, त्याला जबाबदार कोण? नगरसेवक सुद्धा या कामी लक्ष देत नाहीत, त्यांना पण सांगून झाले.
              तरी लवकरात लवकर गटारीचे काम आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण व्हावे . श्री सिद्धनाथ मंदिरात येणाऱ्या भाविकांना ही या अपूर्ण राहिलेल्या गटारांची दुर्गंधी येऊन,परिसरातील वातावरण प्रदुषित होत आहे   शिवाय गटार कामावरील सळया उघड्याच पडल्यामुळे दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही,  तरी , या कामी आपण वैयक्तिक लक्ष घालून काम पूर्ण करण्याची ही विनंती करण्यात आली आहे. या निवेदनावर या परिसरातील सुमारे पंचवीस ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
छायाचित्र,,,,,,,
1)अर्धवट बांधकाम राहिल्याने उघड्या गटारात साठून राहिलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे,,परिसरात प्रदूषण वाढले आहे. ््
2) पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी रोडवर,उघडीच राहीली असून ती पण फुटली असल्याने तिला तात्पुरती मलमपट्टी केलेली असली तरी त्यातूनही पाणी गळत आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!