सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला गत वैभव आणण्यासाठी गट तट बाजूला सारून एकसंध पक्षाची ताकद दाखवू : रणजितसिंह देशमुख

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी
           देश व राज्यपातळी काँग्रेस पक्षाची ताकद वाढत आहे  सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला  गत वैभव आणण्यासाठी जिल्हा पातळीवरील  पदाधिकारी प्रयत्न करत आहेत तसेच प्रयत्न माण खटाव तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला बळकटी आणुन माण खटाव हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळख पुसलेली पुन्हा निर्माण करण्यासाठी पक्षातील  गट तट बाजूला सारून एकसंध पक्षाची ताकद दाखवण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याचे आवाहन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माण खटावचे नेते आणि आखिल भारतीय कॅांग्रेस कमिटी चे सदस्य रणजितसिंह देशमुख यांनी दहिवडी येथे कार्यकर्त्याच्या बैठकीत केले
    माण तालुका काँग्रेस कमिटीची बैठक माण खटाव तालुक्याचे नेते रणजितसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीला माण तालुक्याचे जेष्ठ नेते बाळासाहेब माने, माजी तालुकाध्यक्ष एम के भोसले यांचे उपस्थितीत पक्षाची संघटणात्मक बांधणीबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली ज्या ज्या विभागात पक्षीय बांधणीस अडचण असेल त्या सोडवून गावो गावी पुन्हा पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न पदाधिकारी यांनी करायचा आहे पक्ष वाढीसाठी व संघटन करण्यासाठी  पदाधिकारी यांच्यावर विभागवार जबाबदारी देण्यात आली. गाव वाड्या वस्तीपर्यंत कॅांग्रेस पक्षाचे विचार पोहोचवून जातीयवादी भाजपाला हद्दपार करण्याचा निश्चय करण्यात आला.
      आज दहिवडी येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलच्या प्रमुख पदाधिकारी यांची मिटिंग घेण्यात आली यावेळी प्रथम मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला त्वरित अटक  करावी त्याच प्रमाणे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी  केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री मा पृथ्वीराज चव्हाण बाबा यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याला तात्काळ अटक करुन या मागील खरा सुत्रधार कोण याची चौकशी व्हावी अशी मागणी करणारे दोन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. हे ठराव माण तालुक्याची ज्येष्ठ नेते एम. के भोसले यांनी मांडला तर त्याला अनुमोदन नकुसाताईताई जाधव आणि बाळासाहेब माने यांनी दिले. यावेळी माण तालुक्यातून प्रत्येक जिल्हा परिषद गटातून तळागाळातील स्वाभिमानी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब माने, ज्येष्ठ नेते नेते एम. के भोसले, माण विधानसभेचे अध्यक्ष डॉक्टर महेश गुरव, माण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब माने, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमरजीत कांबळे, माण विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप सजगणे, माण तालुका प्रवक्ता शिवाजीराव यादव, बाळासाहेब आटपाडकर,माण तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, तालुका काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्ष नकुसा जाधव, धर्मराज जगदाळे माजी सभापती, पोपटराव खरात, रामभाऊ जगदाळे, सदाशिवराव शिंदे, पोपट खरात,रवी शिंदे, निलेश पोळ, संदीप चव्हाण, विजय बाबर, श्रीदास डमकले, माण तालुका अल्पसंख्याकांचे अध्यक्ष गब्बारभाई काझी यासह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!