महायुतीचा मेळावा हॉटेल सरोवर उंब्रज येथे संपन्न

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
श्रीकांत जाधव उंब्रज कराड

कराड उत्तर भाजपचे उमेदवार मनोज दादा घोरपडे यांचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद मेळावा उंब्रज हॉटेल सरोवर बुधवारी संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मनोज दादा यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते .

दरम्यान शिवसेनेचे पदाधिकारीयांना व कार्यकर्त्यांना संबोधताना मनोज दादा घोरपडे म्हणाले की उंब्रज च्या पारदर्शक पुलाचा विषय हा उंब्रज मधील नागरिकांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे त्यासाठी आम्ही वेळप्रसंगी आंदोलने ही केली वेळोवेळी आम्ही केंद्र शासनाकडे त्याचा पाठपुरावाही केला आहे आणि आपली महायुतीची सत्ता आल्यास आपण स्वतः तो विषय मार्गी लावणार आहोत तसेच उंब्रज मध्ये नगरपंचायत होणे खूप गरजेचे होते उंब्रजच्या सर्वांगीण विकासासाठी हा महत्त्वाचा विषय आहे तरीही अजून उंब्रजला नगरपंचायत झाली नाही विद्यमान लोकप्रतिनिधी याच्याकडे लक्ष द्यायला हवे होते. उंब्रज व मसूर मधील अंतर्गत परिस्थिती खूप बिकट आहे नगरपंचायत झाली असती तर कोट्यांनी निधी या परिसराला मिळाला असता. पण कोणामुळे नगरपंचायतीचा विषय रखडला हा सर्व जनतेला माहिती आहे. आपण आमदार झाल्यावर शेतीचा असेल पाण्याचा असेल नगरपंचायतीचा , पुलाचा विषय असेल हे व सर्व आपण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मार्गी लावणार आहोत. तसेच जास्तीत जास्त शासनाच्या निधी विकासासाठी व शासनाच्या योजना लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील यासाठी सदैव कार्यरत राहणार आहोत असे आश्वासन त्यांनी मेळाव्या दरम्यान दिले.

यावेळी उपस्थित मान्यवर :
महायुतीचे अधिकृत उमेदवार .मनोजदादा घोरपडे ,शिवसेना जिल्हा अध्यक्ष शिंदे गटाचे जयवंतराव शेलार, कराड उत्तर तालुकाप्रमुख तुषार निकम ,उंब्रज शहर अध्यक्ष .संतोष बेडके ,कराड उत्तर शहर महिला अध्यक्ष सौ.विमल सुपनेकर, आदी मान्यवर भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!