मनोज दादा यांच्या प्रयत्नातून तारळी धरणाचे पाणी आरफळ कॅनॉल मध्ये सोडण्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
कराड-प्रतिनिधी
मनोज दादांच्या यशस्वी प्रयत्नांतून मसूर आणि कोपर्डी विभागातील शेतकऱ्यांचे नंदनवन होण्याच्या मार्गावर आहे
कोपर्डी लिंक मधुन तारळी धरणाचे पाणी आरफळ कॅनॉल मध्ये सोडण्याचे काम पूर्ण झाले असुन,पाणी सोडुन ट्रायल पूर्ण झाली आहे.
एअरहोल प्रॉब्लेम झाल्यामुळे पाणी येण्यासाठी थोडा वेळ लागेल. कराड उत्तरचे भाजप नेते मनोज दादा घोरपडे यांनी राज्यमंत्री कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष नामदार महेश दादा शिंदे यांच्या माध्यमातून अतिशय कमी वेळेत अनेक स्थानिक अडचणींवर मात करून गेली अनेक वर्ष राखडलेला प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल कराड उत्तर आणि विशेष करून मसूर आणि कोपर्डे विभागातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने दोन्ही दादांचे खुप खुप आभार.


