व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड (दिलीपराज कीर्तने) महाराष्ट्र,आंध्र,कर्नाटक, विदर्भ,मराठवाडा आदी राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवडचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्दनाथ मंदिरातील भुयारात असलेल्या स्वयंभू शिवलिंगाचे महाशिवरात्रीच्या रात्री सुमारे सत्तर हजार भाविकांनी रांगेतून दर्शन घेण्याचा लाभ घेतला.
हे भुयार वर्षातून एकदाच भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येते.येथील श्री सिध्दनाथ मंदिरातील भुयारात एक स्वयंभू शिवलिंग आहे.ते वर्षभर बंद अवस्थेत असते.वर्षातून फक्त एक वेळ, तेही महाशिवरात्रीच्या रात्री रात्रभर तमाम भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात येते.
या परंपरागत चालत आलेल्या पद्धती,रिवाजानुसार सालाबादप्रमाणे श्रींची दैनंदिन रात्रीची आरती संपल्यानंतर रात्री 10 वाजता हे भुयार उघडण्यात आले.
प्रथम भुयारातील साफसफाई करून परंपरागत प्रथेनुसार स्वयंभू शिवलिंगाला पंचामृत व गरम उदकाने अभ्यंग स्नान घालण्यात आले.नंतर विधीपूर्वक पंचामृताने जलाभिषेक करण्यात आला.नंतर सालकरी यांच्या हस्ते शिवलिंगास दहीभात पूजा बांधण्यात आली.व आरती झाल्यानंतर दहीभात पूजा उतरविण्यात आली.पुन्हा गरम उदकाने स्वयंभू शिवलिंगास स्नान घालण्यांत आले. त्यानंतर बेल,फुले, आंब्याचा मोहर,चंदन,हळदी,कुंकू, गुलाल,बुक्का,भस्म, अक्षता,श्रीफळ,आदी पूजा साहित्य वाहून संकल्प सोडण्यात आला.हा सर्व धार्मिक विधी सालकरी व सालकरीण यांच्या हस्ते परंपरागत प्रथेनुसार करण्यात आला.हा धार्मिक विधी पिंटू पाठक व प्रजोत पाठक या पुरोहितां मार्फत उरकल्यानंतर स्वयंभू शिवलिंग भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.
रात्री 10 वाजता भाविकांच्या रांगेतून दर्शनास प्रारंभ झाला. रात्री 10 पासून पहाटे साडेसहा वाजेपर्यंत दर्शन रांगेतून सुमारे सत्तर हजार भाविकांनी या स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनाचा लाभ घेतला.
पहाटे साडेसहा वाजता पुन्हा सालकऱ्यांच्या हस्ते शिवलिंगास स्नान घालून, संपूर्ण भुयाराची स्वच्छता करून भुयाराचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले.परंपरागत प्रथेनुसार सर्व धार्मिक विधी उरकून दरवर्षी हेभुयार स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनासाठी खुले करण्यात येते. दरम्यान ,चालू वर्षी या भुयारात एक सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसवून हत्ती मंडपातील मोठ्या स्क्रिनवर भुयारातील स्वयंभू शिवलिंगाचे दर्शनाचा लाभ हृदय विकार, शुगर, अपंग,ऑपरेशन झालेले,दहा वर्षाच्या आतील मुले,गरोदर महिला,तसेच ज्यांना दम्याचा आजार आहे आणि वयोवृद्ध महिला,पुरूष अशा तमाम भाविकांना भुयारात न जाता स्यावयंभू शिवलिंगाच्चाया दर्शनाचा लाभ बाहेर बसून घेता आला.यामुळे तमाम भाविकांनी समाधान व्यक्त केले. वयोवृद्ध,लहान मुले,आजारीअसणारे ,वजनदार यांना भुयारात जाता येत नसल्याने ते भाविक या स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनापासून वंचित राहतात,त्यांची सोय झाल्याने यावेळी तमाम भाविकांनी समाधान व्यक्त केले.तसेच या भुयारात उतरण्यासाठी प्रारंभी चार फुटांपर्यंत पायऱ्या नाहीत,त्यामुळे भाविकांच्या दोन्ही दगडांना धरून भुयारात सोडले व दर्शनानंतर वर गेले जात असे,मंदिराच्या अस्तित्वात पासून अशीच पद्धत सुरू होती. मात्र चालू वर्षी देवस्थान ट्रस्टने भुयारात उतरण्यासाठी व चढण्यासाठी पायऱ्या तयार करू घेतल्यामुळे तमाम भाविकांनी देवस्थान ट्रस्टचे आभार मानून समाधान व्यक्त केले. यावेळी देवस्थान ट्रस्ट व पोलिस स्टेशन यांचेकडून भाविकांच्या सोयीसुविधांसाठी सर्व प्रकारे खबरदारी घेण्यात आली.