व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड प्रहार जनशक्ति पक्षाच्या वतीने छ. संभाजी नगर ( औरंगाबाद ) येथे शुक्रवार दि.९ रोजी होणार्या राज्यव्यापी आंदोलनामध्ये माण- खटाव तालुक्यातील हजारो कार्यकर्ते प्रहार जनशक्ति पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ति पक्षाचे माण तालुका अध्यक्ष नंदकिशोर पवार व खटाव तालुका अध्यक्ष अक्षय ननावरे यांनी दिली आहे. प्रहार जनशक्ति पक्षाचे प्रमुख आ. बच्चु कडु यांनी राज्यभरातील सर्व दिव्यांगाना आंध्रप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही प्रतिमहा ६ हजार रुपये पेन्शन दिली जावी, या सह इतर अनेक मागण्या राज्य शासनाकडे केली असुन या मागणीची पुर्तता होण्यासाठी शुक्रवार दि. ९ ऑगष्ट रोजी छ. संभाजी नगर याठिकाणी राज्यभरातील दिव्यागांचा व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे, या मेळाव्यासाठी प्रहार जनशक्ति पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांच्या नेतृत्वाखाली माण – खटाव विधानसभा मतदार संघातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. प्रहार जनशक्ति पक्ष हा सर्वसामान्यांच्या व दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठी नेहमीच अग्रेसर राहिला आहे. सातारा जिल्ह्यातही या पक्षाने जिल्हाध्यक्ष पिसे यांच्या नेतृत्वाखाली मोठे जाळे निर्माण केले आहे. माण – खटाव विधानसभा मतदार संघात पिसे यांनी गत ७ वर्षापासुन दिव्यांग, निराधार महिला, व्यक्ती, जेष्ठ नागरीक, परितक्त्या, कला, क्रिडा आदींसाठी खुप मोठे काम प्रहार जनशक्ति पक्षाच्या माध्यमातुन केले आहे. प्रहार जनशक्ति पक्षाचे प्रमुख आ. बच्चु कडु यांनी अरविंद पिसे यांचे आजवर सुरु असलेले कार्य पाहुनच राज्यात सर्व प्रथम विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी जाहिर केली असुन माण – खटावच्या पाणी प्रश्नाची सखोल माहिती असणारे व्यक्तीमत्व अशी अरविंद पिसे यांची ओळख असुन सर्वसामान्यांचा आधारवड ठरलेल्या पिसे यांच्या एका आवाहनामुळे माण – खटाव तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी छ. संभाजीनगर येथे होणार्या आंदोलन व मेळाव्यास उपस्थित राहण्याचे ठरवले आहे.