गावाबाहेर किंमत नसणारानीं पवारसाहेबांचीं मापे काढू नयेत.* *मा सरपंच अभय मेनकुदळे.
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
शिखरशिंगणापूर —/
काही दिवसापूर्वी शिंगणापूरच्या राजाराम बोराटे यांनी शरद पवार यांनी माढा मतदार संघात केलेली कामे दाखवावीत असे विधान केले होते. त्यामूळे राजाराम बोराटे यांनी केलेले विधान हे बालिशपणाचे व केवळ सवंग लोकप्रियतेसाठीचे असून राष्ट्रीय नेत्यांची बरोबरी करणे हे हास्यास्पद आहे. गावाबाहेर किंमत नसणाऱ्यांनी पवार साहेबांची मापे काढू नये. असा स्पष्ट इशारा शिंगणापूर येथे पत्रकार परिषदेत देऊन, माजी सरपंच अभय मेनकुदळे यांनी त्याबाबतचा खुलासा केला आहे.
शिंगणापूर च्यां राजाराम बोराटे यांनी राजकारण हा धंदा मांडला आहे. गावाभावात भांडणे लावून पोलीस स्टेशन आडून पैसे उकळणे या कामा शिवाय त्याचें कोणतेही विकास काम नाही. माझ्या पाच वर्षाच्या कालावधीत शिंगणापूर ग्रामपंचायत इमारतीचे मी सुशोभीकरण केले. केवळ विकास कामाचे फलक लावले नाहीत.
नां शरद पवार, आ रामराजे निंबाळ कर , आ. प्रभाकर घार्गे, त्याच बरोबर राष्ट्रवादी पार्टीच्या माध्यमातून सुमारे पाच कोटीची विकासकामे मी तीर्थक्षेत्र शिंगणापूर मध्ये उभी आहेत.या मध्ये सुमारे अडीच कोटी चें शिंगणापूर प्राआरोग्य केंद्र, 25 लाख व्हिलेज रुरलं हट, 12 लाख 50 हजार बेलदेव वस्ती बंधरा, 12 लाख 50 हजार बलीप वस्ती बंधरा, कैलास नगर सुशोभीकरण 5 लाख, 20लाख कर्चे वस्ती साठी. खर्ची टाकले आहेत. हीं सर्व विकास कामे प्रत्यक्षात उभी आहेत.यांचे सर्व श्रेय नां शरद पवार साहेब वं राष्ट्रवादी पार्टीचे आहे. गेल्या 25 वर्षात गावचा विकास करू नं शकलेल्या राजाराम बोराटे यांनी केवळ स्वतःचा स्वार्थ साधला आहे. त्या मूळे पवार साहेबानं सारख्या दिग्गज नेत्यांची मापे काढण्याचे धंदे बोराटे यांनी करू नयेत. शिंगणापूर वं शिंगणापूर बाहेर राजाराम बोराटे यांनी केलेली विकास कामे दाखून द्यावीत असे आव्हान शिंगणापूर चें माजी सरपंच अभय मेनकुदळे यांनी शिंगणापूर येथील पत्रकार परिषदेत केले. यावेळी माण पत्रकार सघांचे सर्व सदस्य उपस्थिती होते.