उंब्रज येथील प्रसिद्ध भांड्याचे व्यापारी शंकर मारुती मोहिरे यांचे घर फोडून अंदाजे सुमारे १३ लाख रुपयांच्या आसपासच सोन्याचे दागिने लंपास केले.
उंब्रज ग्रामपंचायत च्या मागील बाजूस असणारा हा बंगला पहाटे २ ते ६ च्या सुमारास अज्ञात चोरट्यानी मागील बाजुंनी दरवाजा तोडून घरातील सोन्याचे दागिने चोरून नेले. या वेळी घरातील सर्व कुटुंब नात्या मधील एका विवाह समारंभासाठी पुणे येथे गेले होते. सया संधीचा फायदा घेऊन ही चोरी करण्यात आली असावी आणि स्थानिक पातळीवर याचा विचार केला तर चोरांना याची खबर लागली कशी अशी ही चर्चा जनतेतून व्यक्त होत आहे.तरी अधिक तपास स्थानिक पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी श्री.भोरे आणि त्यांची टीम करत आहे.