अपघात सदृश्य ठिकाणी स्पीड ब्रेकर व्हावा. …..विश्वंभर बाबर.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड.. प्रतिनिधी
     म्हसवड येथे वरचेवर रस्ता अपघात होणाऱ्या ठिकाणी आवश्यक त्या प्रमाणात स्पीड ब्रेकर निर्माण करण्याची मागणी कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर  यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
       याबाबतचे लेखी निवेदन प्रा. विश्वंभर बाबर यांनी सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव यांच्याकडे केली आहे.गेल्या एक महिन्याच्या कालावधीत म्हसवड नजीकच्या मायणी चौकात दोन वेळा भीषण अपघात झाले.या अपघातात तीन व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला,तर काहीजण गंभीर जखमी झाले. कुकुडवाड कडून म्हसवड मायणी चौकात  येताना, व रस्ता क्रॉस करून पुन्हा त्याच बाजूला जाताना वाहनधारक  कसलाही विचार न करता वेगाने वाहन चालवतात  परिणामी अपघात हा ठरलेला असतो. सदर ठिकाणी नुकत्याच झालेल्या अपघातामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झालेले आहेत,तर काहीजण कायमचे अपंग झाले आहेत.
     म्हसवड येथील मायणी चौक, सिद्धनाथ हायस्कूल चांदणी चौक,याबरोबरच क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाच्या दोन्ही बाजूला  आवश्यक त्या प्रमाणात स्पीड ब्रेकर करण्याची मागणी कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी सातारा कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव यांच्याकडे केलेली आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!