दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. मौजे मलवडी, ता. माण, गावातील श्रीराम ज्वेलर्स या दुकानात चोरट्यांनी ६५,०००/- रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले.
दिनांक ४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ९:३० ते ५ डिसेंबर २०२४ सकाळी ६ वाजेच्या दरम्यान, मलवडी एसटी स्टँडजवळील श्रीराम ज्वेलर्सचे शटर व ग्रीलचे कुलूप तोडून दुकानात चोरी झाली.
चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सपोनि अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. तपासी अधिकारी स.पो.फौ. पी.जी. हांगे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दहिवडी पोलीस ठाणे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत असून कोणतीही महत्त्वाची माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे