सोशल मीडियावर तलवार, कोयते यांसारखी घातक हत्यारांचे स्टेट्स ठेवणे युवकाला पडले महागात
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख 🙁 पोलीस टाइम रिपोर्टर )
गोंदवले खुर्द
सोशल मीडिया मधील व्हाट्सअप ग्रुप आणि इंस्टाग्राम यावर दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील भांडवली गावचा राहणारा प्रतीक शंकर नामदास याचे तलवार, कोयते यांसारखी घातक हत्यारे घेऊन वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल झालेले होते..
या अनुषंगाने गोपनीय माहिती काढून त्याच्या हालचालींवर वॉच ठेवून त्याला भांडवली इथून ताब्यात घेतलेले असून त्याच्या घरातून सर्व तलवारी , कोयते, चॉपर जप्त केलेले असून दहिवडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ४ , २५ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून त्यास अटक केलेली आहे..
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी याद्वारे माण खटाव तालुक्यातील सर्व नागरिकांना तसेच युवकांना आवाहन केले आहे की कोणीही आपल्या ताब्यात घातक हत्यारे ,शस्त्रे यांसारख्या गोष्टी ठेवू नयेत ..अशी कोणतीही व्यक्ती आम्हाला मिळून आल्यास त्यांच्यावर शस्त्र अधिनियम कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात येणार आहे.. तसेच युवकांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की कोणीही सोशल मीडियावर अशा प्रकारचे व्हिडिओ अपलोड करू नये हा कायद्यान्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे ..असा प्रकार घडल्यास आणि तुमच्यावर कारवाई झाल्यास तुमचे संपूर्ण करिअर उध्वस्त होऊ शकते.. तसेच अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य बिलकुल खपवून घेतले जाणार नाही..
आदरणीय पोलिस अधीक्षक श्री समीर शेख सरांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे कोणीही व्यक्ती अशा प्रकारचे कृत्य करेल आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असून कडक कारवाई करण्यात येणार आहे..