म्हसळा हिंदु ग्रामस्थ मंडळासाठी सन २०२४ चा चैत्र पौर्णिमा उत्सवाची होणार इतिहासात नोंद
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
शासन निर्णयानुसार ग्राम दैवत श्री धावीरदेव महाराजांना मिळणार आहे रायगड पोलिसांची मानवंदना.*
# *म्हसळा हिंदु ग्रामस्थ मंडळाच्या प्रयत्नांना यश.*
# *खासदार सुनिल तटकरे यांचे ग्रामस्थानी मानले विशेष आभार
म्हसळा – प्रतिनिधी रायगड
म्हसळा शहर आणि परिसरातील वाड्या वस्तीवरील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आणि भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या, सर्वजाती धर्मांच्या नागरिकांत बंधुभाव वाढविणाऱ्या आणि गावागावांत शांतता व सुबत्तता राखणाऱ्या श्री.धाविरदेव महाराजांचा यात्रोत्सव सोमवार दिनांक २२ एप्रिल २०२४ रोजी संपन्न होत आहे.


