म्हसवड शहराचा आज (दि . १४)आठवडी बाजार हा यात्रा पटांगणाच्या मैदानावर घेण्यात आला असुन याची नोंद आठवडी बाजार ला येणाऱ्या नागरीकांनी, व्यापाऱ्यानी, शेतकऱ्यानी व व्यावसायिकांनी घ्यावी असे आवाहन म्हसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी केले आहे.
या बाबत प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी आठवडी बाजारासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांनाआवाहन केले आहे की म्हसवड नगरपरिषद हद्दीतील सर्व व्यापारी वर्ग, शेतकरी बांधव व नागरीकांना सुचित करणेत येते की, दि. १५/०८/२०२४ रोजी गुरूवारी स्वातंत्र्य दिनाच्या राष्ट्रध्वजारोहणाचा कार्यक्रम बाजार पटांगण येथे होणार आहे. तरी दिनांक १४/०८/२०२४ रोजी बुधवार चा आठवडा बाजार हा यात्रा पटांगण येथे भरविणेत येणार आहे. तरी, बस स्थानक परिसर, महात्मा फुले चौक ते विठ्ठल रूक्मीणी मंदीर परिसर या ठीकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजुला शेतकरी अथवा व्यापारी यांनी बसु नये. याची सर्व व्यापारी वर्ग, शेतकरी बांधव व नागरीकांनी नोंद घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे.