इंजि सुनील पोरे यांनी आर्थिक मदत केलेल्या माणगंगा शैक्षनिक संकुलात घेतलेल्या विंधन विहिरीस पाणीच पाणी

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड

     इंजि सुनील पोरे यांनी  माणगंगा शैक्षनिक संकुलातील विध्यार्थ्यांना  पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या करिता विंधन विहीर खोदण्यासाठी आर्थिक मदत केलेल्या  शैक्षनिक संकुलातील विंधन(बोअर ) विहिरीस चांगले पाणी लागल्यामुळे पोरे यांचे अभिनंदन करण्यात आले 

     येथील माणगंगा शैक्षनिक संकुलातील शाळेच्या दहावी परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थीयना निरोप व शुभेच्छा कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन म्हसवड येथील इंजि सुनील पोरे व पत्रकार विठ्ठल काटकर याना माणगंगा शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष डॉ वसंत मासाळ यांनी निमंत्रित केले होते

     यावेळी संकुल आवार व शाळेची पाहणी करताना तेथील विद्यार्थ्यांची पाण्याची अडचण लक्षात घेता आपले भाषणात इंजि सुनील पोरे यांनी विंधन विहीर घेणे बाबत सुचित केले व त्यास लागणारी आर्थिक मदत करू असे अभिवचन दिले होते     

     

         त्याप्रमाणे शाळेचे अध्यक्ष डॉ वसंत मासाळ यांनी विंधन विहिरीसाठी पाहणी करुन विंधन विहीर घेतली त्यास भरपूर पाणी लागले असुन शाळेचा व मासळवाडी करांचा ऐन दुष्काळात पिण्याचे पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला असलेने अनेकांनी इंजि पोरे याना धन्यवाद दिले व योग्य मार्गदर्शक लाभले तर कसे कोटकल्याण होते अशा भावना अनेकांनी बोलुन दाखविल्या

     योग्य कामासाठी योग्य वेळी केलेल्या आर्थिक मदतीचे फलीत झाल्याचे समाधान मिळाले


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *