विठामाता विद्यालयाची यशाची परंपरा कायम

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते,
कराड:प्रतिनिधी
     विठामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावी एसएससी परीक्षा 2024 चा निकाल 96.35% लागला आहे. विद्यार्थिनींनी विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम ठेवली असून, उत्कृष्ट निकालाची परंपरा पुढे चालवली आहे.

     विद्यालयात विशेष श्रेणीमध्ये 94, प्रथम श्रेणीत 64, आणि द्वितीय श्रेणीत 62 विद्यार्थिनींनी उत्तीर्ण झाल्या आहेत. यंदाच्या निकालात विद्यालयातील प्रथम क्रमांक कुमारी संदे अलिशा अकील हिने 95.80% गुणांसह मिळवला आहे. द्वितीय क्रमांक कुमारी कदम मनस्वी विनायक हिने 95.60% गुण मिळवले असून, तृतीय क्रमांक कुमारी फडतरे श्रावणी सुरेश हिने 95.20% गुणांसह प्राप्त केला आहे.

    संस्कृत विषयात विशेष प्राविण्य मिळवत, कुमारी संदे अलिशा अकील, कुमारी मुल्ला अलीया रियाज, आणि कुमारी कांबळे सिद्धी केरू यांनी प्रत्येकी 100 गुण मिळवले आहेत.

       विद्यालयाच्या सर्व विद्यार्थिनींचे, मुख्याध्यापिका सौ. थोरात यू. ए., तसेच मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराडचे अध्यक्ष व सचिव आदरणीय श्री. जयवंत पांडुरंग पाटील तसेच खजिनदार श्री. संजय बदीयाणी आणि सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!