म्हसळा ग्राम दैवत श्री धावीरदेव महाराजांना शासकीय मानवंदनेची परंपरा निरंतर राहणार – सुनिल तटकरे
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
सुशील यादव
म्हसळा – रायगड
भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि मनोकामना पुर्ण करणाऱ्या म्हसळा ग्राम दैवत श्री धावीरदेव महाराज यांच्या यात्रोत्सवात या वर्षा पासुन देण्यात आलेली शासकिय मानवंदनाची परंपरा यावर्षा पुरती सिमित न रहाता कायम स्वरुपी राहणार असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी मानवंदना कार्यक्रमाचे स्वागत कार्यक्रमाला मनोगत व्यक्त करताना सांगितले.


