नुकत्याच झालेल्या विविध वयोगट निहाय शालेय जिल्हा आट्यापाट्या स्पर्धेत क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील तीन शाखांचा प्रथम क्रमांक आला असून त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे जिल्हास्तरीय शालेय आट्यापाट्या स्पर्धा नुकत्याच दहिवडी येथे संपन्न झाल्या. क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम स्कूल सीबीएसई म्हसवड शाळेचा 14 वर्षे वयोगट मुलींचा संघ जिल्ह्यात प्रथम आला आहे. याबरोबरच क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड 14 वर्षे वयोगट मुले संघ तसेच आत्मगिरी माध्यमिक विद्यालय म्हसवड 17 वर्षे वयोगट मुलीच्या संघाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला असून त्यांची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक चंद्रकांत तोरणे, तुकाराम घाडगे व पांडुरंग भोसले यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर, संस्था सचिव सुलोचना बाबर, संस्था उपाध्यक्ष ॲडव्होकेट इंद्रजीत बाबर तसेच संकुलात मुख्याध्यापक अनिल माने, प्राचार्य विन्सेंट जॉन, शिक्षक व पालकांनी सर्व वयोगटातील संघाचे अभिनंदन केले.