उत्तुंग व्यक्तिमत्व देव माणूस हरपला छत्रपती उदयनराजे भोसले यांनी वाहिली रतनजी टाटा यांना आदरांजली

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते कराड सातारा

टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. 28 डिसेंबर 1937 ला जन्मलेल्या रतन टाटांनी देशाच्या औद्योगिक जडण घडणीत मोलाचा वाटा उचलला.

‘टाटा’ हे फक्त नाव नाही. तर तो विश्वास, विश्वासार्हतेला असलेला समानार्थी शब्द आहे. टाटांच्या घराण्यातील प्रत्येकानं तो सार्थ करून दाखवला आहे. याच टाटा समूहातील आणखी एक चकाकता हिरा म्हणजे रतन टाटा. भारतीय उद्योगविश्वाचा मुकुटमणी असलेले रतन टाटा फक्त उद्योग विश्वासाठीच नव्हे तर सर्व भारतीय समाजासाठीच आदर्श होते. ज्यांच्यापुढे सर्वांनीच आदरानं नतमस्तक व्हावं अशा काही मोजक्या व्यक्तिमत्त्वांपैकी ते एक होते.

उत्तुंग व्यक्तिमत्व देव माणूस हरपला

खासदार उदयनराजे भोसले यांनी आदरांजली वाहताना असे म्हटले आहे की काळ कोणासाठी थांबत नाही हे जरी खरे असले तरी सन्माननीय रतन जी टाटा यांच्या जाण्याने समस्त भारतीयांना ज्या वेदना होत आहेत त्या व्यक्त करताना निश्चितच शब्द नाहीत ,.आपले उत्पन्न समाजासाठी उपयोगात आणणारा असे व्यक्तिमत्व असा देव माणूस पुन्हा घडणार नाही. रतनजी टाटा यांच्या जाण्याने भारतीय उद्योग क्षेत्रात आणि समाजात जी काही पोकळी निर्माण झाली .आहे. ती कधीही न भरून येणारी आहे त्यांच्या जाण्याने आमच्यासह समस्त भारतीयांचा आधारस्तंभ हरवला आहे समाजातील एक देव माणूस हरपला लाखो तरुणांना रोजगार देणारा हात आपल्यातून कायमचा निघून गेला आहे अशा शब्दात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी छत्रपती घराण्याच्या वतीने आणि समस्त जनतेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली .आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!