तीव्र उन्हामुळे हैराण झालेल्या जिवाला रसवंतिगृहाचा आधार !

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
दिलीपराज किर्तने: प्रतिनिधी
         म्हसवड 
म्हसवड सह माण तालुक्यातील गोंदवले,दहिवडी, शिंगणापूर,मोही,मार्डी,वाकी, वरकुटे,देवापूर,पुळकोटी,वरकुटे, मलवडी,,काळचौंडी तसेच म्हसवड परिसरातील तीस खेड्यापाड्यातून  उन्हाळ्याच्या तीव्र झळा वाढतच आहेत. दुपारो १२ नंतर अधिक तीव्र उन्हामुळे रसवतिगृहासह थंड पेयाच्या दुकानातील गर्दीमध्ये दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे.
मे महिना संपत आला तरी उन्हाच्या झळा कमी होताना दिसत नाहीत. उन्हाच्या कडाक्याने जनता हैराण झाली असून तापमानाने सरासरी पातळी ओलांडल्याने उन्हाचा चांगलाच चटका जाणवू लागला आहे. रस्ते उन्हाच्या तीव्रतेमुळे ओस पडू लागले आहेत. आठवडाभरात सरासरीहून अधिक तापमानाची नोंद होत आहे. कमाल तापमान ४० तर किमान २२ अंश सेल्सिअसच्या जवळपास असल्याने उकाडा असह्य होत आहे. गेल्या आठवडाभरात अवकाळी पावसाने हजेरी पाठलावल्याने उकाड्याच्या तीव्रतेत अधिकच भर पडली आहे. असल्याचे दिसून येते.  दुपारच्या वेळीस उन्हाने तापलेले जीव घटकाभर विश्रांतीसाठी  झाडाच्या सावलीचा आधार घेताना दिसत आहेत. उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी बाजारात आलेल्या कलिंगड, काकडी, टरबूज, अननस, द्राक्षे यासारख्या फळांची विक्री तेजीत सुरू आहे. अवजड कलिंगड घरी नेवून खाण्यापेक्षा दुपारी ऐन उन्हात उभे राहून कलिंगडची काप. खाणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढल्याचे दिसून येते. उन्हाने तहानलेल्यांना थंडगार पाण्याने तृप्त करण्यासाठी वापरण्यात येणारा व गरिबांचा फ्रीज संबोधला जाणारा माठ, रांजण यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. ऐन दुपारच्या वेळीस रसतिगृहे गदीने फुलू लागली आहेत. या रसवंती गृहावर सर्वसाधारण दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत गर्दी अधिक जोर धरत आहे.
रसवंतिगृहाबरोबर थंड लिंबू सरबत, लस्सी या पेयांची विक्री वाढली आहे. स्थानिक पातळीवर उत्पादित केल्या जाणाऱ्या सोडा, लेमन तसेच कुल्पीच्या विक्रीतही वाढ होत आहे. उन्हाच्या कडाक्यापासून बचाव करण्यासाठी स्विमिंग टॅंकवर लहान मुले, तरुण पोहण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. उन्हाच्या तीव्रतेबरोबर लोकांच्यांं आरोग्यविषयक तक्रारी वाढल्याचे दिसून येत आहे. वीज पुरवठ्यावर अवलंबून असलेले पंखे. एसी ही थंड हवा देणारी यंत्रणा उप्प झाली आहे. कारण वारंवार,,अगदी दोन,दोन मिनिटांनी खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे तमाम जनता अक्षरश: हैराण झाली आहे आणि ” या वीज वितरण कंपनीला कुणी वाली आहे का नाही???”,,,,,असा वारंवार संतप्त सवाल उपस्थित करण्याऱ्या तमाम  नागरिकांकडून,”असह्य होणाऱ्या उन्हाळ्यात तरी वीजपुरवठा खंडित करू नये,”अशी आग्रही मागणी वारंवार केली जात आहे.
=====================

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *