शेतातून जाणाऱ्या पाऊल वाटेच्या कारणावरुन वहिनी व तिच्या ६ वर्षाच्या मुलाला कुऱ्हाडीने मारहाण आरोपी गणेश राजकुमार लिंगे यास सोनगाव बारामती येथून अटक

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड

     याबाबत सविस्तर माहिती अशी दिनांक ६ रोजी सायंकाळी ६ वा.चे सुमारास मौजे म्हसवड ता.माण जि.सातारा गावचे हद्दीत लिंगेवस्ती नावचे शिवारात सौ.वैशाली सत्यम लिंगे वय २७ वर्षे( रा.म्हसवड लिंगेवस्ती)व त्यांचा मुलगा यशवंत वय ६ वर्ष असे दोघे शेतातुन गवत घेवुन घराचे जवळ आले असता त्यांचा चुलत दीर गणेश राजकुमार लिंगे हा हातात कुऱ्हाड घेवुन आला व म्हणाला की, शेतात जाणारी पाऊलवाट ही तुझ्या एकटीच्या बापाची आहे काय? असे म्हणुन तुझा मुलगा यशवंत यास जिवंत ठेवत नाही असे म्हणुन त्याने त्याचे हातातील कुऱ्हाड जिवे मारण्याचे उद्देशाने मुलगा यशवंत याचे डोक्यात उजवे बाजुला मारुन गंभीर जखमी केले                 तसेच यशवंतची आई सौ.वैशाली आपल्या मुलाला उचलत असताना तिला ही हाताने लाथाबुक्याने मारहाण करत शिवीगाळ दमदाटी केली आहे म्हणुन सौ.वैशाली लिंगे यांनी गणेश राजकुमार लिंगे रा.म्हसवड ता.माण जि.सातारा याचे विरुध्द म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली

     त्यानुसार या घटनेचा तपास मा.सपोनि बिराजदार यांचे मार्गदर्शना खाली पोउनि वाघमोडे यांनी करून सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश राजकुमार लिंगे रा.म्हसवड यास सोनगाव बारामती येथून ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्ह्यात आरोपीस अटक करण्यात आलेले असून जखमी यशवंत सत्यम लिंगे वय 6 वर्षे रा.म्हसवड ता.माण यास प्रथम गलंडे हॉस्पिटल म्हसवड व नंतर लाईफलाईन सुपर स्पेशालिटी या हॉस्पिटल पंढरपुर येथे उपचारासाठी नेहण्यात आले आहे


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!