वारकऱ्यांची सेवा हीच खरी वारी – ‘पोरे रूग्णवाहिके’चे कौतुक
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड / प्रतिनिधी
माऊली फाऊंडेशन, मुंबई या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून यंदाही संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी सोहळ्याच्या मार्गावर दिनांक २८ जून ते २ जुलै २०२५ या कालावधीत (फलटण ते वेळापूर दरम्यान) विविध वैद्यकीय सेवा शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमात ‘ सुनील पोरे रूग्णवाहिका’ मोलाची ठरली.
या सेवेसाठी नासपचे सातारा जिल्हाध्यक्ष मा. इंजि. श्री. सुनील पोरे साहेब यांनी पोरे रूग्णवाहिका माऊली फाऊंडेशनच्या सेवेसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली. या रूग्णवाहिकेमुळे अनेक वारकऱ्यांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली आणि संस्थेला देखील सेवा पुरवण्यात मोठी सुलभता आली.
विशेष उल्लेख करावा लागेल तो या वाहनाचे चालक श्री. बाळासाहेब सांगावे यांचा. त्यांनी चालक म्हणून आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडलेच, शिवाय वारकऱ्यांच्या पायांना मालिश करून त्यांच्या श्रमाला आराम मिळवून दिला. त्यांच्या या सेवाभावाने अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणले.
माऊली फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष अँड. विश्वनाथ टाळकुटे यांनी श्री. सुनील पोरे साहेब यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, भविष्यातही असेच सहकार्य लाभो, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
वारकऱ्यांची सेवा करणाऱ्यांना समाजात मानाचे स्थान मिळायला हवे, कारण हीच खरी वारी!