पाटण तालुक्याला वरदान ठरलेले चाफळ विभागातील गमेवाडी येथील उत्तरमांड धरण व वाघजाईवाडी येथील डेरवण पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरुन सांडव्याव्दारे पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे.
गत पंधरा दिवसापासुन धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या धुवाधार पावसामुळे पाणी पातळीत कमालीची वाढ झाली. आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.गमेवाडी येथे उत्तरमांड धरण असून नाणेगांव ब्रुद्रुक गावच्या सरहद्दिवर उत्तरमांड नदिवर हा प्रकल्प साकारला आहे. संपुर्ण चाफळ विभागासह कराड तालुक्यातील खालकरवाडी, चरेगांव, भवानवाडी, उंब्रज परिसरातील वाड्या वस्त्यांना या धरणाचे पाणी मिळते. सध्या उत्तर मांडचा सांडवा पूर्ण क्षमतेने वाहू लागला. आहे
गमेवाडी येथील उत्तरमांड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 15 दिवसांपासून कमी जास्त प्रमाणात सुरू असलेल्या पावसाने मुबलक पाणीसाठा झाला आहे.क्षेत्रात आतापर्यंत ९०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.उत्तर मांड धरणातील पाणी साठवण क्षमता ०.८८ टीएमसी असून सध्या धरणात ०.८६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.