लेखिका समिक्षा नागेश शेट शिरोडकर यांच्या अंतरंग पुस्तकाचे प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

साखळी (गोवा प्रतिनिधी)

समिक्षा नागेश शेट शिरोडकार यांच्या पहिल्या अंतरंग निबंध संग्रहाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात 5 मे रोजी शिवस्मृती खेडेकर सभागृहा मध्ये साखळी (गोवा) येथे संपन्न झाला .

    यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून विद्या प्रबोधनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भुषण भावे, अध्यक्ष स्थानी गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष श्री वसंत भगवंत सावंत, पुस्तकावर भाष्य गोवा विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ.हनुमंत चोपडेकर, तर खास आमंत्रीत सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री समीर आत्मा प्रभू व लेखिका समिक्षा नागेश शेट शिरोडकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या.
    एक जबाबदार नागरिक म्हणून प्रामाणिकपणे समाजाला चांगल साहित्य देण्याच काम लेखिकेने केले आहे. लेखिके जवळ सुत्रसंचालनाची कला, आयोजन कौशल्य व कलात्मकता आहे ती तिणे वृध्दीगत करावी असे प्रतिपादन अध्यक्षस्थानी असलेल्या गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष श्री वसंत भगवंत सावंत यांनी केले.

        लेखकाचा पहिला वाचक हा लेखक स्वता: असतो. जेव्हा स्वताचं लिखाण वाचून समाधान भेटते तेव्हाच त्याला त्याच्या साहित्यकृतीचे सार्थक होते. प्रत्येक विषय लिहिताना लेखकाची स्वताची अशी शैली असते. अंतरंग हा थोडा माहितीपर, थोडा चिंतनशील, थोडा चिकित्सक असा निबंध संग्रह आहे असे प्रतिपादन विद्या प्रबोधनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भूषण भावे यांनी केले.                   अस्तुरीच्या विशयावर लिहिण्याचा जेवढा हक्क पुरूषाचा आहे तेवढाच हक्क स्त्रिला आहे, विविध लेखकांनी  स्त्री वर आपल्या प्रमाणे भाष्य केले आहे व हाच विचार घेऊन प्रभावीत होऊन लेखिका व्यक्त झालेली आहे. लॉकडाऊन वेळी सामाजिक , शैक्षणीक विषयावर चांगल्या प्रमाणाने लेखिकेने भर घातलेली आहे. लेखिकेने स्वताची अशी आपली शैली विकसीत करावी, सातत्य, संयम, सेगीतपण हे म्हत्वाचे आहे. कष्टाविना फळ मिळत नाही . असे प्रतिपादन गोवा विद्यापिठाचे प्राध्यापक डॉ. हनुमंत चोपडेकर यांनी केले .
       माणूस जन्माला आल्यावर त्याचं अस्तित्व दिसायला पाहिजे. लेखक हा अमर असतो काही काळानंतर तो हयात असू नसू पण त्याच पुस्तक पाहून त्याचं परत जन्म होतो असे म्हणायला हरकत नाही. गायक, कवी म्हणून जेव्हा एखाद्याच नांव येत तेव्हा त्यांच पण अस्तित्व राहत. असे भाष्य खास आमंत्रीत म्हणून श्री समीर आत्मा प्रभू यांनी केले.

       लेखिका समिक्षा शिरोडकर यांनी तिला साहित्याची गोडी लावलेल्या श्री राघोबा लवू पेडणेकर यांची तसेच शिक्षक समीर आत्मा प्रभू व आपल्या आई वडिलांच्या पाठबळ मिळाल्या कारणाने त्यांच्या प्रोत्साहनाने व साहित्य मंथन सत्तरी, डिचोली कोंकणी सेवा केंद्र, कोंकणी सेवा केंद्र साखळी, कुंटुंब प्रबोधन गतिविधी व सम्राट क्लब मये या संस्थेमध्ये सतत कार्यरत असल्या मुळे आज आपली ओळख होत आहे असे मनोगता मध्ये लेखिका समिक्षा शेट शिरोडकर यांनी सांगितले. यावेळी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे उपस्थिती लाभली. वेगवेगळ्या संस्थेचे पदाधिकारी, समिक्षा शेट शिरोडकर यांचे मित्र परिवारां सोबत, लेखिकेचे हितचिंतक, शिक्षक, तसेच ज्येष्ठ व श्रेष्ठ लेखकांनी कार्यक्रम फुलविला.

        कुमारी गौरी प्रभू हिणे आपल्या मधूर आवाजात स्वागतगीत सादर केले. तसेच कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तावीक नारायण झांटये महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. प्रवीण सावंत यांनी केले. पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सालेलकर यांनी केले तर आभार साहित्य मंथन सत्तरीची सदस्या नमन सावंत धावस्कर यांनी मानले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!