जिल्हा परिषद अभियंता संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात तात्काळ बैठक घेण्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा आदेश – इंजिनिअर सुनील पोरे

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी :
जिल्हा परिषद अभियंता संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांबाबत तात्काळ बैठक आयोजित करण्याचे आदेश राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. ही माहिती अभियंता संघटनेचे माजी कार्याध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांनी दिली.

मुंबई येथे झालेल्या बैठकीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची अभियंता संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या शिष्टमंडळात संघटनेचे राज्याध्यक्ष सुहास धारासुरकर, कार्याध्यक्ष सचिन चव्हाण, उपाध्यक्ष किसन साळुंखे, महेंद्र अहिरे, संघटक नागेश चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या भेटी दरम्यान ग्रामविकास मंत्री गोरे यांनी राज्याच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांना तात्काळ बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अभियंत्यांच्या प्रलंबित मागण्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे, असे मत संघटनेचे अध्यक्ष सुहास धारासुरकर यांनी व्यक्त केले.

पुढील बैठक माजी कार्याध्यक्ष सुनील पोरे यांच्या माध्यमातून लवकरच घेण्यात येणार असून, प्रलंबित मागण्यांचा नक्कीच निपटारा होईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!