व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड संवाद साधूया, मने जोडूया परिवर्तनाचे ध्येय नित्य जपूया..! या अभियाना अंतर्गत माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे बीएलओ आणि पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा बुधवार दि. २८ रोजी दुपारी १२.१५ वा. वैभव मंगल कार्यालय पिंगळी बु॥ या ठिकाणी आयोजित केला असल्याची माहिती तालुकाध्यक्ष डॉ.संतोष गोडसे यांनी दिली.
या मेळाव्यात ज्येष्ठ विचारवंत, संपादक मधुकरजी भावे हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , आखिल भारतीय कॉंग्रेस कमेटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
माण- खटाव विधानसभा मतदार संघातील बी एल ओ आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब माने , खटाव तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. संतोष गोडसे व निमंत्रक खटाव – माण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. महेश गुरव यांनी केले आहे .